मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Dharavi Fire: मुंबईच्या धारावी परिसरात मोठी आग, सहा जण होरपळले; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

Mumbai Dharavi Fire: मुंबईच्या धारावी परिसरात मोठी आग, सहा जण होरपळले; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

May 28, 2024 11:09 AM IST

Fire Breaks Out In Dharavi: मुंबई येथील धारावी परिसरात मंगळवारी पहाटे आग लागली.

मुंबईच्या धारावी परिसरात आग लागल्याने सहा जण होरपळले
मुंबईच्या धारावी परिसरात आग लागल्याने सहा जण होरपळले

Mumbai Dharavi Fire News: मुंबईच्या धारावी परिसरात मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा जण होरपळल्याची माहिती समोर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने याबाबत मााहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धारावी परिसरातील काळा किला येथे असलेल्या अशोक मिल कंपाऊंडमधील तीन मजली आणि चार मजली इमारतींना पहाटे ३.४५ च्या सुमारास आग लागली. शहर पोलीस, नागरी वॉर्ड कर्मचारी, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

जखमींवर बीएमसीच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू

या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले आणि चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. जखमींना तातडीने बीएमसीच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींची नावे

सलमान खान (वय, २६), मनोज (वय, २५), अमजद (वय, २२) आणि सल्लाउद्दीन (वय, २८), सैदुल रहमान (वय, २६) आणि रफिक अहमद (वय, २६) असे आगीत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. सलमान खान आणि मनोज दोघेही ८-१० टक्के भाजले आहेत. तर, अमजद, सल्लाउद्दीन आणि सैदुल हे सर्व ३५-५० टक्के भाजले आहेत. रफिक अहमदच्या हाताला किरकोळ दुखापत झाली होती, त्याच्यावर उपचार करून त्याला सोडण्यात आले.

डोंबिवली केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू

डोंबिवली केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील अमुदन केमिकल्समध्ये बॉयलरचा स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीत गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जण जखमी झाले. यानंतर शनिवारी ढिगाऱ्याखालून आणखी एक जळालेला मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा १० वर पोहोचला. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचा मालक मलय मेहता याला अटक केली असून नाशिकमध्ये एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग