मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident: भरधाव ऑटोच्या धडकेत ५० वर्षीय महिला ठार; मुंबईच्या बोरीवली येथील घटना!

Mumbai Accident: भरधाव ऑटोच्या धडकेत ५० वर्षीय महिला ठार; मुंबईच्या बोरीवली येथील घटना!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 31, 2023 10:49 PM IST

Mumbai Borivali Accident: मुंबईतील बोरीवली पश्चिम परिसरात रस्ता अपघात एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Mumbai Accident
Mumbai Accident

Mumbai Accident: मुंबईतील बोरीवली परिसरात भरधाव ऑटो रिक्षाच्या धडकेत एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बोरिवली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर रिक्षा चालकाची जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शहरात आठवड्याभरात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

इंदुमती धनमेहेर (वय, ५०) असे रिक्षाच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. इंदुमती या बोरिवली येथील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होत्या. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास इंदुमती या चंदावरकर रोडवरील प्रसन्न जीवन इमारतीसमोरील रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत इंदुमतीच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. एका वडापाव विक्रेत्याने इंदुमतीचा भाचा भावेशला या घटनेची माहिती दिली. तो तातडीने घटनास्थळी पोहोचला. स्थानिक लोकांनी त्यांना त्वरीत जवळच्या गणेश रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.

या घटनेनंतर आरोपी रिक्षाचालक संजय खंदारे घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बोरिवली पोलिसांनी त्याला पकडले. भावेशने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, रिक्षा चालकाविरोधात भारतीय दंड संहिता कलम २७९ , ३०४ (अ), १३४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि मोटार वाहन कायदा १३४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली.

मुंबई शहरात याच आठवड्यात दोन जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. झोमॅटोचे फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह सौरभ आयरे (वय, २२) आणि हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी मोहम्मद शेख (वय, १९) अशी मृतांची नावे आहेत. सौरभ हा दुचाकीने जात असताना बेस्टच्या बसने त्याला धडक दिली. तर, मोहम्मद शेखचा टेम्पो धडकेत मृत्यू झाला.

WhatsApp channel

विभाग