Mumbai Boy Rape: आता मुलेही सुरक्षित नाहीत! पालकांना जीवे मारण्याची धमकी देत ८ महिने अत्याचार-mumbai 50 year old man arrested for allegedly raping minor boy for 8 months in mulund ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Boy Rape: आता मुलेही सुरक्षित नाहीत! पालकांना जीवे मारण्याची धमकी देत ८ महिने अत्याचार

Mumbai Boy Rape: आता मुलेही सुरक्षित नाहीत! पालकांना जीवे मारण्याची धमकी देत ८ महिने अत्याचार

Sep 22, 2024 03:29 PM IST

Mumbai Minor Boy Rape: मुंबईत १३ वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. ही घटना मुंबईतील मुलुंड परिसरातील सार्वजनिक शौचालयात घडली.

मुंबई: मुलुंडमध्ये १३ वर्षाच्या मुलावर ८ महिने बलात्कार
मुंबई: मुलुंडमध्ये १३ वर्षाच्या मुलावर ८ महिने बलात्कार

13 Year old Boy Rape in Mumbai: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना राज्यात आता मुलेही सुरक्षित नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या मुलंड परिसरात १३ वर्षीय मुलावर आठ महिने अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगा आणि आरोपी एकमेकांसोबत वारंवार परिसरातील सार्वजनिक शौचालयात असल्याने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला त्यांच्यावर संशय आला. त्याने एकेदिवशी दोघांचा पाठलाग केला असता आरोपी मुलावर अत्याचार करत असल्याचे उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दया शंकर जमीनदार राजभर (वय, ५०) असे आरोपीचे नाव आहे. हे प्रकरण १८ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा उघडकीस आले, जेव्हा पीडितेचा शेजारी असलेल्या एका व्यक्तीने मुलुंडच्या एलबीएस रोडवरील सार्वजनिक शौचालयाजवळ मुलाला आरोपीसोबत पाहिले. दोघांना सार्वजनिक शौचालयात एकत्र येण्याची ही पहिली वेळ नव्हती. सार्वजनिक शौचालयात मुलाचे लैंगिक शोषण होत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांचा पाठलाग केला असता हे प्रकरण समोर आले.

शेजाऱ्यांमुळे धक्कादायक प्रकार उजेडात

शेजाऱ्यांनी तात्काळ मुलाची सुटका करून त्याच्या वडिलांना परिस्थितीची माहिती दिली. पीडिताच्या वडिलांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता धक्कादायक माहित समोर आली. पीडित मुलाच्या वडिलांसह शेजाऱ्यांनी त्वरीत मुलुंड पोलिस ठाण्यात धाव घेऊन राजभरविरोधात तक्रार दाखल केली.

Mankhurd Boy Rape: धक्कादायक! मानखुर्दमध्ये १२ वर्षीय मुलावर बलात्कार, तरुणाला अटक

पालकांना जीवे मारण्याची धमकी देत मुलावर आठ महिने अत्याचार

पीडित मुलाने आपल्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आरोपी राजभरने पीडित मुलाला चॉकलेट आणि स्नॅक्ससारखे पदार्थ देऊन त्याच्यावर अत्याचार केले. त्यानंतर राजभरने त्याला सार्वजनिक शौचालयात नेऊन त्याच्यावर त्याच्यावर पुन्हा अत्याचार केले. एवढेच नव्हेतर, राजभरने पीडित मुलाच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर तब्बल आठ महिने अत्याचार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

आरोपी अटकेत

याप्रकरणी आरोपीला १९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. राजभरने गुन्ह्याची कबुली दिली असताना चौकशीदरम्यान त्याने असामान्य वर्तन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजभर सध्या पोलीस कोठडीत आहे. भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यात नमूद केल्यानुसार, आरोपीवर लैंगिक छळ आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner
विभाग