BEST Bus Hits Bread Delivery Man: मुंबईतील आरे कॉलनीत बेस्ट बसच्या धडकेत एक व्यक्तीला आपला जीव गमवाला लागला आहे. मृत व्यक्ती ब्रेड डिलिव्हरी करत असताना मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
सादिक खान (वय, ४७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते मालाड पूर्व येथील दिंडोशी येथील वास्तव्यास होते. खान हे ब्रेडची डिलिव्हरी करण्यासाठी गेले असताना गोरेगाव स्थानकातून मयूर नगरच्या दिशेने जात असलेल्या बेस्ट बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत खान हे बसच्या पाठच्या चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बस चालक रमेश लोंढे (वय, ५८) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५२ क्रमांकाची बेस्टची बस गोरेगाव स्थानकातून मयूर नगरच्या दिशेने जात असताना चालक रमेश लोंढे याने खान यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे रस्त्यावर पडले आणि बसच्या मागच्या चाकाखाली त्यांचे डोके चिरडले गेले. परिसरातील प्रवाशांसह एका कंडक्टरने खानला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस सध्या प्रत्यक्षदर्शी आणि बस चालकाचे जबाब नोंदवत आहेत. चालक लोंढे हा कांदिवली पूर्वेला राहतो.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मेट्रोच्या खांबाला धडक दिल्याने ११ प्रवासी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोमवारी रात्री घोडबंदर रोडवरील ओवळा सिग्नलजवळ हा अपघात झाला.चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. या घटनेत जखमी झालेल्या ११ प्रवाशांना वेदांत, रामानंद आणि टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकल्यामुळे बसच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.