Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि...; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि...; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक

Mumbai: विद्यार्थिनी वर्गात येताच तिला मिठी मारली आणि...; मुंबईतील शाळेत संतापजनक प्रकार, शिक्षकाला अटक

Jan 05, 2025 05:47 PM IST

Teacher Molested Minor Girl In Mumbai: मुंबईतील एका नागरीक संचालित शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील शाळेत विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक
मुंबईतील शाळेत विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक

Mumbai News: मुंबई येथील भोईवाडा पोलिसांच्या हद्दीतील एका शाळेत संतापजनक घटना घडली. शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करून अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली. ही घटना गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पीडित मुलगी १२ वर्षांची असून एका नागरीक संचालित शाळेत शिक्षण घेते. तर, आरोपी या शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण हा विषय शिकवतो. दरम्यान, पीडित मुलगी २७ डिसेंबरला शाळेत धावण्याचा सराव करीत होती. त्यावेळी आरोपीने वर्गाबाहेर डोकावून पाहिले. वर्गाबाहेर कोणीच नसल्याचे समजल्यानंतर त्याने दरवाजा बंद केला आणि पीडित मुलीला स्वत:जवळ खेचत तिला मिठी मारली आणि तिच्याशी अश्लील कृत्य केले. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नको, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. अखेर २ जानेवारी २०२४ रोजी पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या मैत्रीणीला सांगितला. त्यांनी दुसऱ्या शिक्षकाला माहिती दिली. शिक्षकाने मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून या घटनेची माहिती दिली.

नराधम शिक्षकाला अटक

यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संबंधित शिक्षकाविरोधात विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर एक पथक आरोपी राहत असलेल्या परिसरात पाठवण्यात आले. त्यांनी संबंधित शिक्षकाला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

स्त्रियांना लैंगिक त्रास देणाऱ्यांना मदत करू नका- महाराष्ट्र पोलीस

स्त्रियांना लैंगिक त्रास देणाऱ्यांना मदत करू नका. लैंगिक छळाला विरोध करा. छळाला प्रोत्साहन देऊ नका. त्यात सहभागी होऊ नका. अनुकूल प्रसंग असेल तेव्हा लैंगिक छळाचा मुद्दा उपस्थित करा. तुमची मते कणखरपणे मांडा. एखाद्या स्त्रीचा छळ केला जात आहे अशी परिस्थिती लक्षात आली, तर तुम्ही तिला मदत करू शकता. कोणी एखाद्या स्त्रीला त्रास देत असेल, तर 'तुम्हाला कोण त्रास देत आहे?’ असा प्रश्न तिला विचारा. जर गर्दीत एखाद्या स्त्रीने छळाची तक्रार केली, तर 'हे कोण करत आहे, असे अजिबात खपवून घेण्याजोगे नाही’ असे गर्दीला उद्देशून जोरात ओरडा, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत संकेतस्थळवर देण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर