Mumbai Crime: मुंबईतील ३७व्या वर्षीय अभिनेत्रीचे बनावट अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना पाठवल्याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका मित्राने अभिनेत्रीच्या फोटोंशी फेरफार करून तिच्या जवळच्या लोकांना पाठवल्याचा संशय आहे, असे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अंधेरी येथील रहिवासी आहे. दरम्यान, पीडिता २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ओशिवरा येथील एका कॅफेच्या दुकानात असताना तिच्या एका मित्राचा तिला फोन आला. मित्राने तिला कळवले की, त्याला कुलदीप द्विवेदीशी जोडलेल्या फेसबुक अकाऊंटवरून तिचे फेरफार केलेले अश्लील शॉट्स आणि मेसेज मिळाले आहेत. मात्र, कामाच्या कमिटमेंटमुळे तिने लगेच गुन्हा दाखल केला नाही.
पीडिताने ७ जानेवारी रोजी ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडिताच्या आईने तिला फोन केला. तसेच तिच्या वडिलांनाही तिचे अश्लील फोटो मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर एका मैत्रीणीने तिला आणि त्यांच्या कॉमन फ्रेंन्ड्सला ‘kgxjcdjvfdg’ नावाच्या इंन्स्टाग्राम आयडीद्वारे तिचे अश्लील व्हिडिओ मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये मित्रांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ydryhdtj’ नावाच्या आयडीद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
दरम्यान, ३१ डिसेंबर २०२३ रोजी तिच्या एका मैत्रीणीला तिचे फेरफार केलेले अश्लील फोटो इंन्स्टाग्रामवर मिळाले. या फोटोंसोबत तिच्यावर बलात्कार करण्याची धमकीही देण्यात आली. पीडिताने दावा केला आहे की,पुण्यातील पिरानहुट येथे राहणाऱ्या तिच्या एका मित्राने हा प्रकार केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडिताकडून त्याचा मोबाईल क्रमांक घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली.
संबंधित बातम्या