Air India Flight: विमान हवेत असताना सेन्सर झाले बंद, तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघड!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Air India Flight: विमान हवेत असताना सेन्सर झाले बंद, तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघड!

Air India Flight: विमान हवेत असताना सेन्सर झाले बंद, तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघड!

May 27, 2024 09:46 AM IST

Air India Flight Smoking News: एअर इंडियाच्या जयपूर-मुंबई विमानात धुम्रपान केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एअर इंडियाच्या विमानाच्या शौचालयात धुम्रपान केल्याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल
एअर इंडियाच्या विमानाच्या शौचालयात धुम्रपान केल्याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल (HT)

Air India Flight News: मुंबईच्या सहार पोलिसांनी जयपूर-मुंबई विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अर्जुन थलोर (वय- ३४, रा. राजस्थान) याच्यावर २५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मे रोजी घडली. जयपूरहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १५.६७० या विमानात थलोर चढला. प्रवासादरम्यान थलोर हा सीट ७ एफ वर बसला होता. त्याने विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या शौचालयात प्रवेश केला आणि धूम्रपान करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे सेन्सर बंद झाला.एका वरिष्ठ क्रू मेंबरने ताबडतोब शौचालयात जाऊन दरवाजा ठोठावला आणि बाहेरून तो उघडला. तेव्हा थालोर आत धुम्रपान करत असल्याचे दिसले. क्रू मेंबरला पाहताच थलोर ताबडतोब शौचालयातून बाहेर आला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.

विमान मुंबईत उतरले आणि चालक दलाने थलोर यांना एअर इंडियाच्या सुरक्षा विभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला सहार पोलीस ठाण्यात आणले, जिथे त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३३६ (जीवन धोक्यात आणणारे कृत्य) तसेच विमान कायद्याच्या तरतूदी २५ (विमानात धुम्रपान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई-सॅन फ्रान्सिस्को एअर इंडियाचे विमान १८ तास उशिराने

मुंबईहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने आणि एक प्रवासी आजारी पडल्याने विमानाला तब्बल १८ तास उशीर झाला. एआय-१७९ हे विमान शुक्रवारी दुपारी ४ वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणार होते. परंतु तांत्रिक बिघाड लक्षात येताच सुरुवातीला तीन तास उशीर झाला. त्यानंतर विमान सायंकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी पुढे ढकलण्यात आले. मात्र अचानक एक प्रवासी आजारी पडल्याने विमानाला आणखी उशीर झाला आणि त्यानंतर अन्य काही प्रवासीही विमानातून उतरले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर नाईट लँडिंगचे निर्बंध आणि क्रू फ्लाइट ड्युटीच्या मर्यादांमुळे विमान थांबवण्यात आले होते.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर