अत्यंत घाणेरडं कृत्य! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेसमोर तरुणानं...; मुंबईतील संतापजनक घटना-mumbai 34 year old tea stall worker arrested for sexually harassing woman during morning walk at girgaon chowpatty ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अत्यंत घाणेरडं कृत्य! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेसमोर तरुणानं...; मुंबईतील संतापजनक घटना

अत्यंत घाणेरडं कृत्य! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेसमोर तरुणानं...; मुंबईतील संतापजनक घटना

Sep 11, 2024 12:15 PM IST

Mumbai Man Sexually Harassed Woman: मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलोसोबत लज्जास्पद कृत्य करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

मुंबई: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग
मुंबई: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

Mumbai News: महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असताना मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मुंबईतील ग्रँट रोड येथे वास्तव्यास असून ती दररोज सकाळी ७ वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटी येथे मॉर्निंक वॉकला जात. दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी पीडित महिला नेहमीच्या मॉर्निंग वॉकसाठी गेली असताना तरुणाने तिच्या पाठलाग सुरू केला. सुरुवातीला महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. महिला स्ट्रेचिंग एक्सरसाइज असताना संबंधित तरुण तिच्याकडे घाणेरड्या नजरने पाहू लागला. यामुळे महिला तिथून दुसरीकडे गेली. त्यानंतर थोड्यावेळाने त्याने पुन्हा महिलेसमोर येऊन आपली पँट काढली आणि हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर महिलेने अलार्म वाजवला. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील जॉगर्स तिच्या मदतीसाठी धावले आणि संबंधित तरुणाला पकडून डीबी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला महानगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी हा गिरगाव परिसरातील एका चहाच्या स्टॉलवर काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

ठाण्यात १५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ट्युशन क्लासमधून बाहेर पडून अंबरनाथ- बदलापूर महामार्गावरून पायी घरी जात होती. आरोपी रिक्षाचालकाने तिला पुढच्या बसस्टॉपवर सोडतो, असे सांगून लिफ्ट दिली. त्यानंतर रिक्षात सीएनजी कमी असल्याचे कारण देत त्याने तिला अंबरनाथ सीएनजी पंपावर नेले. यू-टर्न घेण्याच्या बहाण्याने त्याने तिला अंबरनाथ डम्पिंग ग्राऊंडकडे नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.

रिक्षाचालकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाने पीडिताला मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि डम्पिंग ग्राऊंडवर सोडून निघून गेल्याचे मुलीने म्हटले. पीडिताला वेदना होत असल्याने पालकांनी तिला रुग्णालयात नेले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा भारतीय न्याय संहितेच्या पॉक्सो कलमान्वये बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नंतर आजूबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Whats_app_banner
विभाग