मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahalakshmi Express: कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या महिलेनं महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दिला बाळाला जन्म

Mahalakshmi Express: कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या महिलेनं महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दिला बाळाला जन्म

Jun 12, 2024 07:34 AM IST

Woman Gives Birth To Baby Girl In Mahalakshmi Express: महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिला. संबंधित महिला कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने येत होती.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना महिलेने बाळाला जन्म दिला.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना महिलेने बाळाला जन्म दिला.

Mumbai: कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या एका महिलेने एक्सप्रेसमध्ये बाळाला जन्म दिला. फातिमा खातून (वय, ३१) असे संबंधित महिलेचे नाव आहे. फातिमा ही पती हूसैन तय्यबसोबत मुंबईच्या मीरा रोड येथे राहते. तय्यब दाम्पत्याला आधीच तीन मुले असल्याने मुलगी व्हावी यासाठी ते तिरुपतीला नवस बोलायला गेले होते आणि देवाने त्यांचे ऐकले. कोल्हापूरहून मुंबईला येताना रस्त्यातच फातिमाने एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याने तय्यब दाम्पत्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

लोणावळ्याला पोहोचल्यानंतर फातिमाला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या आणि ती वॉशरूममध्ये गेली. त्यानंतर त्यांनी रेल्वे कंट्रोलशी संपर्क साधून मदत मागितली. कर्जत रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक आणि स्ट्रेचर तयार ठेवण्यात आले होते आणि प्राथमिक तपासणीनंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. फातिमाची प्रसूती नॉर्मल झाल्याने तिला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला, अशी माहिती कर्जत जीआरपीचे अधिकारी मुकेश ढगे यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

हूसैन म्हणाला की, आम्हाला मुलगी व्हावी, यासाठी आम्ही तिरुपतीला प्रार्थना करायला गेलो होतो.आमच्या बाळाचा जन्म ट्रेनमध्ये झाला. माझ्या मुलीला आयुष्यभर ट्रेनमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी मी कर्जत येथील रेल्वे कार्यालयातही गेलो. तिथे मला रेल्वेकडून फोन येईल, असे सांगण्यात आले, पण अद्याप असा कोणताही फोन आला नाही, असे तय्यब म्हणाला. कर्जत नगरपरिषदेतील अधिकारी या प्रक्रियेस दिरंगाई करत असल्याने जन्म दाखला मिळविण्यासाठी आता धडपडत असल्याचेही त्यांनी सांगितले. “मी दोनदा कार्यालयात गेलो पण प्रमाणपत्र मिळाले नाही. मी असा प्रवास करत राहू शकत नाही. मी वारंवार कार्यालयात जाऊ शकत नाही. मी एक गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे, असेही तो म्हणाला.

तय्यब हा भंगार विक्रेता आहे. दरमहा १५००० रुपये कमावतो आणि मुलाचा जन्म ट्रेनमध्ये झाल्यामुळे सरकारने त्याला काही प्रमाणात मदत करावी अशी अपेक्षा आहे. रेल्वे पीआरओशी संपर्क साधला असता, अधिकारी म्हणाले की, “ट्रेनमध्ये जन्मलेल्या मुलांना मोफत प्रवास देण्याची अशी कोणतीही योजना नाही, असे तय्यब म्हणाला.

फातिमा नऊ महिन्यांची गरोदर होती आणि ती पती आणि तीन मुलांसोबत प्रवास करत होती. “माझ्या बाळाच्या जन्माला डब्यातील इतर प्रवासी महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद मानत होते. म्हणून आम्ही आमच्या मुलीचे नाव लक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आता आशा आहे की, रेल्वे देखील तिला आयुष्यभर मोफत पास देईल. ट्रेनमध्ये झालेल्या अनपेक्षित प्रसूतीसाठी ही एक उत्तम भेट असेल, असे तय्यब म्हणाला.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर