Mumbai scaffolding collapse News: मुंबईतील बोरिवलीत दुर्दैवी घटना घडली. बांधकामाधीन इमारतीभोवती बांधलेली परांची कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. ही दुर्घटना नेमके कशामुळे घडली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बोरीवली येथे २४ मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या १६ व्या मजल्याभोवती बांधण्यात आलेली परांची कोसळून चार कामगार जखमी झाले. त्यांना तातडीने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. तर, चौथ्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि शहर अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवलीतील एका निर्माणाधीन इमारतीत तीन मजुरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या