Mumbai Rape: दक्षिण मुंबईत कोचिंग सेंटरमध्ये शिकायला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली करण्यात आली. तर, एक जण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पीडिताच्या वर्तनातील बदल लक्षात घेता तिच्या आईने समुपदेशनासाठी बाल विकास केंद्रात दाखल केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सख्खे भाऊ असून ते दक्षिण मुंबईतील रहिवाशी आहे. याच परिसरात आरोपींचे कोचिंग सेंटर होते, जिथे इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जायचे. त्यांच्याकडे ३५-४० मुली शिकायला येत होत्या. पीडिता देखील याच कोचिंग सेंटरमध्ये शिकायला जात होती. दरम्यान, २०२२ मध्ये पीडिताच्या पालकांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून पीडिता तिच्या आईसोबत राहते. परंतु, पीडिताच्या वर्तनातील बदल लक्षात घेऊन तिच्या आईने तिला समुपदेसनासाठी बाल विकास केंद्रात दाखल केले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एका समुपदेशकाला आपण शिकायला जात असलेल्या कोचिंग सेंटरमधील तिघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचेही तिने सांगितले. परंतु, बदनामीच्या भितीने पीडिताने याबाबत च्या आईला माहिती देऊ नये, अशी समुपदेशकाकडे विनंती केली आणि कोचिंग सेंटरमध्ये जाणे बंद केले.
समुपदेशकाने मुलीच्या आईला परिस्थितीची माहिती दिल्यानंतर तिची आई आणि पीडित मुलीने पोलीस धाव घेतली. परंतु, सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या तक्रार नोंदवून घेण्यात नकार दिला. मात्र, शुक्रवारी उशिरा बालविकास केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेत अधिकृतपणे गुन्हा दाखल केला. आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत विनयभंग, बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि गुन्हेगारी धमकी तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO), २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. आरोपींचा मोठा भाऊ अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक राजेश एस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात. शुक्रवारी आरोपी रिषभ कुमार (२७) याने पीडिताला घरी बोला तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला, त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून बीएनएसच्या कलम ६५ (२) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.