Mumbai Suicide News: मुंबईतील चुनाभट्टी- सायन परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. औषधोपचार करून आजारपण बरे होत नसल्याने संबंधित तरुणाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
आशिष विरशेट्टी हट्टे असे आत्महत्या केलेल्या २९ वर्षीय तरुणाचे नाव असून तो चुनाभट्टी- सायन येथील म्हाडा कॉलनीतील श्रीरंग सोसायटीमध्ये राहायला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा दिर्घकाळापासून आजारी होता. औषधोपचार करुनही आजार बरा होत नसल्याने तो मानसिक तणावात होता. अखेर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत कुटुंबाला आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. या तरुणाने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, आजारपणामुळे तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. तसेच मृताच्या आत्महत्येबाबत कोणावरी संशय किंवा तक्रार नसल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. पण प्रत्येक समस्येचे निवारण होऊ शकते. कोणतीही समस्या किंवा अडचण असल्यास सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील थोर आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.
संबंधित बातम्या