अंधेरीत पायलट युवतीच्या आत्महत्येने खळबळ! नॉन व्हेज खात असल्याने बॉयफ्रेंड करायचा मारहाण, गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अंधेरीत पायलट युवतीच्या आत्महत्येने खळबळ! नॉन व्हेज खात असल्याने बॉयफ्रेंड करायचा मारहाण, गुन्हा दाखल

अंधेरीत पायलट युवतीच्या आत्महत्येने खळबळ! नॉन व्हेज खात असल्याने बॉयफ्रेंड करायचा मारहाण, गुन्हा दाखल

Nov 28, 2024 07:12 AM IST

Andheri Pilot suicide case : अंधेरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २५ वर्षीय पायलट युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

अंधेरीत पायलट युवतीच्या आत्महत्येने खळबळ! नॉन व्हेज खात असल्याने बॉयफ्रेंड करायचा मारहाण, गुन्हा दाखल
अंधेरीत पायलट युवतीच्या आत्महत्येने खळबळ! नॉन व्हेज खात असल्याने बॉयफ्रेंड करायचा मारहाण, गुन्हा दाखल

Andheri Pilot suicide case : मुंबईच्या अंधेरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पायलट असलेल्या २५ वर्षीय युवीतीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. या घटनेची माहिती बुधवारी ८ वाजता पोलिसांना मिळाली. दरम्यान, या तरुणीचे तिच्या बॉयफ्रेंड सोबत वाद झाले असल्याची माहिती असून या प्रकरणी बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सृष्टी तुली (वय २५) असे या पायलट तरुणीचे नाव आहे. ती एका खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून काम करत होती. तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. २५ नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आदित्य पंडित (वय २७) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सृष्टीचे गेल्या काही वर्षांपासून एका तरूणासोबत प्रेमसंबंध होते. तिच्या या प्रेमप्रकरणाविषयी तिच्या घरच्यांना देखील महिती होती. आदित्य हा सृष्टीला ती नाॉन व्हेज खात असल्याने तिच्याशी वाद घालायचा. यातून त्याने तिला मारहाण देखील केली आहे. त्यामुळे तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे. सृष्टी ही २० दिवसापूर्वी घरी गेली होती. त्यावेळी ती खुश होती असे तिच्या घररच्यांनी पोलिसांना सांगितले

श्वास गुदमरून झाला मृत्यू

युवतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यात तिचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचे समोर आले आहे. फाशी घेऊनच तिने आत्महत्या केल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली आहे. तरुणीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉयफ्रेंड आदित्य पंडितला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दुन्हा दाखल केला आहे.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे म्हणाले, मृत युवती ही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता, नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहे. यात सृष्टीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत वाद झाला होता, दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यातूनच ती त्रस्त होती, म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस तपास करत आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर