Mumbai Women Suicide: मुंबईत प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Women Suicide: मुंबईत प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Mumbai Women Suicide: मुंबईत प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

May 10, 2024 07:59 AM IST

Mumbai Jogeshwari Suicide News: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथे प्रियकर आणि मित्राच्या मानसिक छळाला कंटाळून २४ तरुणीने आत्महत्या केली.

मुंबई: मानसिक छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली.
मुंबई: मानसिक छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली.

Mumbai Suicide: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ३ मे २०२४ रोजी घडली. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी तिचा प्रियकर आणि ऑनलाईन मित्राविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

Suicide Prevention: थांबा, आत्महत्येचा विचार करत असाल तर या गोष्टी आधी करा!

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनी तिचा प्रियकर सूरज आचार्य आणि ऑनलाइन मित्र करण रावल या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. करण रावलला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला १० मे २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या तरुणीच्या प्रियकराची पोलीस लवकरच चौकशी करतील अशी अपेक्षा आहे. मृत तरुणी जोगेश्वरी पूर्व येथे आई वडिलांसह वास्तव्यास होती. ती बीकॉम ग्रॅज्युएट असून खाजगी ट्यूशन घ्यायची. तिने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बोरिवली येथे राहणाऱ्या सूरज आचार्याशी तिचे प्रेमसंबंध असून दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला असल्याचे आई-वडिलांना सांगितले.

World Suicide Prevention Day : चिंता, डिप्रेशन विसरा, फक्त फॉलो करा या गोष्टी!

सोशल मीडियावर झालेली ओळख महागात पडली

यानंतर सोशल मीडियावर तरुणीची रावल यांच्याशी ओळख झाली. तरुणीने वारंवार टाळूनही रावल तिला भेटण्याचा प्रयत्न केला. रावल हा तिच्या घराजवळ येऊन तिला त्रास देऊ लागला. तसेच तिचा मानसिक आणि शारिरिक छळ करू लागला. तरुणीने तिच्यासोबत घडत असलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांच्या कानावर घातला. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी फोनद्वारे रावलला आपल्या मुलीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, रावलने उद्धटपणे बोलत मुलीचे आयुष्य उद्धवस्त करून टाकण्याची धमकी दिली. तरुणीने आचार्यसोबतचे प्रेमसंबंध न तोडल्यास तिला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही तो म्हणाला. यामुळे तरुणीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. त्यावेळी बदनामीच्या भितीने तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.

उपाचारापूर्वीच तरुणीचा मृत्यू

सूरजला रावलबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याने तरुणीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिच्या असलेले संबंध तोडण्याची धमकी दिली. यामुळे तरुणीचा मानसिक ताण वाढला. ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता तिने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. तिच्या पालकांनी तिला जवळच्या कुलकर्णी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर