Mumbai : माता न तू वैरिणी! पतीशी झालेल्या भांडणातून नवजात बाळाला रेल्वे स्थानकावर टाकून दिलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : माता न तू वैरिणी! पतीशी झालेल्या भांडणातून नवजात बाळाला रेल्वे स्थानकावर टाकून दिलं!

Mumbai : माता न तू वैरिणी! पतीशी झालेल्या भांडणातून नवजात बाळाला रेल्वे स्थानकावर टाकून दिलं!

Oct 18, 2024 09:00 AM IST

Infant Found at Lokmanya Tilak Terminus: पोटच्या एक वर्षाच्या मुलाला लोकमान्य टिळक टर्मिनसवर सोडून निघून गेलेल्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मुंबई: महिलेने पोटच्या बाळाला रेल्वे स्थानकावर दिलं टाकून
मुंबई: महिलेने पोटच्या बाळाला रेल्वे स्थानकावर दिलं टाकून

Mumbai News: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील गेट क्रमांक ३ येथे १० महिन्यांचे बाळ आढळून आल्याने खळबळ माजली. यानंतर रेल्वे पोलिसांनी नवजात बाळाला ताब्यात घेऊन कुर्ला पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका महिलेने हे बाळ कपड्यात गुंडाळून रेल्वे स्थानकावर ठेवून निघून गेल्याचे दिसून आले. कुर्ला पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिची विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पतीशी झालेल्या वादातून या महिलेने पोटच्या बाळाला रेल्वे स्थानकावर टाकून दिल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सपना जैस्वाल असे या महिलेचे नाव आहे. सपना कुर्ला पश्चिम येथील साबळे नगर येथे आपल्या पतीसह भाड्याच्या घरात राहते. सपनाला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिचा पती टॅक्सी चालक असून त्यांची आर्थिक परिस्थिती कुमकवत आहे. यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असे. घटनेच्या दिवशीही सपनाचे तिच्या पतीसह भांडण झाले.त्यानंतर तिने रागाच्या भरात आपल्या एका वर्षाच्या मुलाला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे टाकून दिले आणि याबाबत आपल्या पतीला फोन करून माहिती दिली. परंतु, ती खोटे बोलत असेल, असे तिच्या पतीला वाटले, त्यामुळे तो रेल्वे स्थानकावर गेला नाही.

सपनाचा हेतू मुलाला कायमचा सोडून देण्याचा नव्हता, तर कौटुंबिक वादातून तिने मुलाला रेल्वे स्थानकावर सोडून दिले, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.मात्र, पोलिसांनी सपनाविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर