मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: सिमेंटच्या स्तंभातून लोखंडी प्लेट काढताना पाय घसरला; पाचव्या मजल्यावरून पडल्यानं मजुराचा मृत्यू

Mumbai: सिमेंटच्या स्तंभातून लोखंडी प्लेट काढताना पाय घसरला; पाचव्या मजल्यावरून पडल्यानं मजुराचा मृत्यू

Jun 06, 2024 12:56 PM IST

मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी पाचव्या मजल्यावरून मजुराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ठेकेदार आणि विकासकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या विक्रोळी परिसरात पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या विक्रोळी परिसरात पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. (HT_PRINT)

Mumbai News: मुंबईतील विक्रोळी पूर्वेला एका बांधकामाच्या ठिकाणी तोल गेल्याने एका २३ वर्षीय मजुराचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. मृत बिजॉय कर्माकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून तो काही वर्षांपूर्वी मुंबईत आला होता आणि जुनी इमारत पाडण्याचे काम वडील आणि इतर सहा मजुरांसोबत करत होता.

ट्रेंडिंग न्यूज

फिर्यादी सुनील कर्माकर (वय, ५१) हे पत्नी पौर्णिमा (वय, ४५) आणि दोन मुले बिजॉय (वय, २३) आणि सुजान (वय, २६) यांच्यासह विक्रोळी पूर्व येथील कन्नमवारनगर १ येथे वास्तव्यास आहेत. सुनील आणि बिजॉय हे इतर मजुरांसह पाचव्या मजल्यावर काम करत असताना ४ जून रोजी ही घटना घडली. बिजॉय सिमेंटच्या स्तंभातून लोखंडी प्लेट काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरला आणि त्याचा तोल गेल्याने तो इमारत क्रमांक २५२ च्या ए आणि बी विंगमधील अंतरात तो पडला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

मजुराच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पाठिला गंभीर दुखापत

बिजॉय यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. साईट सुपरवायझर कुरुमूर्ती खत्रावत व इतर मजुरांनी त्यांना तातडीने विक्रोळीतील टागोर नगर येथील आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर पाहून त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. उपचारादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास बिजॉयचा मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

बी विंग आणि ए विंग दरम्यानची मोकळी जागा संरक्षक जाळीने सुरक्षित न ठेवणे आणि काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा साधने न पुरविणे या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी कामगार ठेकेदार गणेश अमीन आणि विकासकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ) आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

माहिम: इमारतीचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू

मुंबईच्या माहिम परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (६ जून २०२४) संध्याकाळच्या सुमारास घडली. बॉम्बे स्कॉटिश शाळेजवळील दिलीप गुप्ते मार्गावरील एका मजली रिकाम्या इमारतीचा पहिल्या मजल्याचा मोठा स्लॅब कोसळला, ज्यात मजुराचा मृत्यू झाला, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग