प्रेयसीच्या ४ वर्षाच्या मुलानं पँटवर लघवी केल्यानं त्याचा जीव घेतला! मुंबईतील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रेयसीच्या ४ वर्षाच्या मुलानं पँटवर लघवी केल्यानं त्याचा जीव घेतला! मुंबईतील धक्कादायक घटना

प्रेयसीच्या ४ वर्षाच्या मुलानं पँटवर लघवी केल्यानं त्याचा जीव घेतला! मुंबईतील धक्कादायक घटना

Updated Oct 29, 2024 10:09 AM IST

Man Kills girlfriend son In Mumbai: मुंबईतील कुर्ला परिसरात प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई: पँटवर लघवी केली म्हणून प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या
मुंबई: पँटवर लघवी केली म्हणून प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या

Mumbai News: मुंबईतील कुर्ला येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. पँटवर लघवी केली म्हणून एका व्यक्तीने प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत मुलाच्या आईच्या प्रियकराविरोधात नेहरू नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

रितेश अजय चंद्रवंशी (वय, १९) असे आरोपी प्रियकराचे नाव असून तो कॅन्टीनमध्ये काम करतो. मृताची आई मूळची पटनाची आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर या महिलेची आरोपीशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती आपल्या मुलांना घेऊन आरोपीसोबत मुंबईत आली. मुंबईतील कुर्ला ईस्टमधील पत्रा चाळमध्ये दोघेही मुलांसोबत राहू लागले. दरम्यान, २६ ऑक्टोबर २०२४ रोजी महिला मुलांना आरोपीजवळ ठेवून कामावर निघून गेली. त्यावेळी महिलेच्या मुलाने आरोपीच्या पँटवर लघवी केली. यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याला अत्यंत क्रुरपणे मारहाण केली.

महिला कामावरून परतल्यानंतर मुलांनी तिला सर्व प्रकार सांगितला. यानंतर महिलेने आपल्या मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, मुलाने औषध घेतल्यानंतर त्याच्या पोटात दुखू लागले. यामुळे महिलेने ताबडतोब त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला त्वरीत सायन रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेने नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

पालघर: सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून देण्यात आला. मृत मुलीचा रविवारी वाढदिवस होता. यामुळे संध्याकाळी घराच्या शेजारी तिचा वाढदिवस साजरा केला जात होता. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतरही मुलगी घरी न परतल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. यानंतर नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला असता ११.३० वाजताच्या सुमारास ती घरापासून काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. घरच्यांनी त्वरीत तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हत्येपूर्वी मुलीवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासून निष्पन्न झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर