मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर पुद्दुचेरीत सामूहिक बलात्कार! आईची भांडण करून घराबाहेर पडले महागात, चौघांना अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर पुद्दुचेरीत सामूहिक बलात्कार! आईची भांडण करून घराबाहेर पडले महागात, चौघांना अटक

मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर पुद्दुचेरीत सामूहिक बलात्कार! आईची भांडण करून घराबाहेर पडले महागात, चौघांना अटक

Nov 08, 2024 05:57 AM IST

pudducheri Mumbai girl rape case : पुद्दुचेरीत आई वडिलांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर पुद्दुचेरीत सामूहिक बलात्कार! आईची भांडण करून घराबाहेर पडले महागात, चौघांना अटक
मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर पुद्दुचेरीत सामूहिक बलात्कार! आईची भांडण करून घराबाहेर पडले महागात, चौघांना अटक

pudducheri Mumbai girl rape case : आई-वडिलांशी भांडण करून बाहेर पडलेल्या मुंबईतील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना पुद्दुचेरी येथे उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचे आई वडिलांशी भांडण झाल्याने ती घराबाहेर पडली होती. यावेळी ती एका रिक्षातून बाहेर पडली होती. सुरवातीला रिक्षा चालकाने व त्यानंतर ६ मुलांच्या ग्रुपने तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला एका समुद्र किनारी सोडून दिले. पालकांनी मुलगी हरवली असल्याची तक्रार दिल्यावर, एका समुद्र किनारी पीडिता ही गंभीर अवस्थेत सापडली. त्या नंतर या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत रिक्षा चालकासह चौघांना अटक केली आहे. आणखी फरार तीन आरोपींचा शोध ठेतला जात आहे.

आरोपी काजा मोहिद्दीन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे रिक्षा चालकाचे नाव आहे. तर इतर आरोपींची नावे समजू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील रहिवाशी असलेली पीडित मुलगी ही पुद्दुचेरी येथे तिच्या आई वडिलांसोबत दिवाळीच्या सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी गेली होती. दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या दरम्यान, तिचे तिच्या आईशी भांडण झाले होते. या कारणावरून पीडित मुलगी ही घराबाहेर पडली. दरम्यान, तिने आरोपी आरोपी काजा मोहिद्दीन यांच्या रिक्षात बसून पर्यटन स्थळी घेऊन जाण्यास सांगितले. 

मात्र, आरोपी रिक्षा चालकाने तिला थेट घरी नेले. त्या ठिकाणी तिला मारहाण करत जबरदस्तीने दारू पिण्यास सांगितले. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने तिला पहाटेच्या सुमारास पुद्दूचेरी येथील ऑरोविल येथे सोडून देऊन पळ काढला. यानंतर पीडित मुलगी ही सेरेनिटी समुद्रकिनारी गेली. या ठिकाणी ती बसली असताना चेन्नईतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या सहा तरूणांना ती दिसली. दरम्यान, आरोपींनी तिच्याशी मैत्री केली. यावेळी तिने तिला तिच्या मित्राच्या घरी चेन्नईला जायचे असल्याचे तिने सांगितले. त्यांनी तिला चेन्नईला सोडण्याचे आश्वासह देत स्वतःच्या हॉटेलवरील रुमवर नेले. यानंतर सर्व ६ जणांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर २ नोव्हेंबरला तिला टॅक्सीतून पुन्हा पुद्दुचेरी येथे आणून सोडले.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने पीडित मुलीच्या आईने पुद्दुचेरी येथील ग्रँड बाजार पोलीस ठाण्यात ती हरवली असल्याच तक्रार दिली. पोलिस तिचा शोध घेत असतांना ती येथील बिच रोडवर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले तेव्हा मुलगी गंभीर अवस्थेत होती. तिला बोलता देखील येत नव्हते. तिला दवाखान्यात भरती केल्यावर तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी करण्यात आल्यावर हा तिने तिच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला.

दरम्यान, पोलिसांनी मुलीने दिलेल्या माहितीनुसार तातडीने रिक्षा चालक मोहिद्दीन व इतर तीन मुलांना अटक केली आहे. तर आणखी तिघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर