Minor Boy Rape In Mumbais Mankhurd: बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना मुंबईतील मानखुर्द येथून सगळ्यांना हादरून टाकणारी माहिती समोर आली. एका २३ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत १२ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता आरोपीने त्याला मानखुर्दच्या सोनापूर येथील निर्जळस्थळी नेले आणि त्याच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलाने घरी परतल्यानंतर त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबाना सांगितला. पीडिताच्या कुटुंबाने तात्काळ मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो मद्यधुंद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अको उर्फ शरद साबळे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी हा मानखुर्द येथील रहिवाशी असून तो नेहमी दारूच्या नशेत असतो, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. घटनेच्या दिवशीही आरोपी नशेतच होता, असे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात तीन मित्रांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटन उघडकीस आली. तसेच पीडित महिलेला या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर महिलेने आत्महत्या केली. पीडित महिला आईला भेटायला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर तिने गावातील एका तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिसांनी महिलेच्या मोबाईलची हिस्ट्री तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अनैतिक संबंध ठेवण्यासाठी आरोपी महिलेला त्रास देत असल्याचे समजले. याच त्रासाला वैतागून महिलेने आत्महत्या केली. सुरज नकाते (वय, २९), तोसिफ मुजावर (वय, २४) आणि शुभम नकाते (वय, २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.