Mumbai: जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी; मुंबईतील घाटकोपर येथील घटना!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी; मुंबईतील घाटकोपर येथील घटना!

Mumbai: जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी; मुंबईतील घाटकोपर येथील घटना!

Dec 27, 2024 12:45 PM IST

12 year old Mauled By German Shepherd: मुंबईतील घाटकोपर येथे जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.

जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी
जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी

German Shepherd Dog Attack Boy: मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे मित्रांसोबत उद्यानात जात असताना जर्मन शेफर्ड कुत्र्याने एका १२ वर्षीय मुलावर हल्ला केला. या हल्लात मुलगा जखमी झाला. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी पंतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मालकाने कुत्र्याला सेफ्टी पट्टा लावला असता तर, कदाचित ही घटना टाळता आली असते, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहे.

नेमके काय घडले?

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगरात राहणारे फिर्यादी अमोल बाबासाहेब किर्ते (वय, ४७) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांचा मुलगा मित्रांसह त्यांच्या घराजवळील बीएमसी गार्डनकडे जात होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मालकासोबत उभ्या असलेल्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने त्यांच्या मुलावर हल्ला केला. कुत्र्याने मुलाच्या डाव्या हाताच्या मनगटाला आणि कंबरेला चावा घेतला. या हल्ल्याची माहिती मिळताच मुलाच्या वडिलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले, तिथे उपचारानंतर मुलाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुदैवाने, मुलाला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.

पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी किर्ते यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी श्वानमालक अब्दुल करीम प्रधान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, १२५ (अ) आणि २९१ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ९ च्या १०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी करीमने कुत्र्याला सेफ्टी पट्टा लावला नव्हता, अशी माहिती पंतनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

मालकाला नोटीस

कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्याने महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वान परवाना घेतला होता की नाही आणि तो कुत्र्यांच्या मालकीबाबत महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत होता की नाही? याची पडताळणी केली जात आहे.

जगभरात जर्मन शेफर्ड ही एक प्रख्यात श्वानाची प्रजाती आहे. हा श्वान प्रामुख्याने शिकारी स्वभावाचा आहे. हा एक वॉचडॉग म्हणून देखील ओळखला जातो. नाकाद्वारे सुंगण्याची त्याची क्षमता इतर श्वानांपेक्षा त्याला वेगळा करतो. या गुणांमुळे पोलिस श्वान पथक,गुप्तचर यंत्रणांमध्ये तो बघायला मिळतो. जर्मन शेफर्ड हा अतिशय अज्ञाकारक असतो. जर्मन शेफर्ड ही ब्रिडिंग केलेली प्रजाती आहे. ही प्रजाती १८९९ मध्ये अस्तित्वात आली. अशा अनेक कारणांमुळे या श्वान विशेष आहे

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर