महायुती सरकार मोठा निर्णय! लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली, महिलांना आता तीन महिन्यांचे हफ्ते मिळणार-mukhyamantri mazi ladki bahin yojana update state government to extend last date for application ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महायुती सरकार मोठा निर्णय! लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली, महिलांना आता तीन महिन्यांचे हफ्ते मिळणार

महायुती सरकार मोठा निर्णय! लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली, महिलांना आता तीन महिन्यांचे हफ्ते मिळणार

Sep 02, 2024 10:23 PM IST

Mukhyamantri mazi ladki bahin yojana : राज्यातील अधिकाधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट

Ladki Bahin Yojna: यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत जवळपास २ कोटी ४० लाख  महिलांनी अर्ज केले आहेत. अजूनही नाव नोंदणीसाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे. आज योजनेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिवशीही महिलांची गर्दी दिसून येत होती. आता या योजनेबाबत मोठी अपटेड समोर येत आहे. महिलांची नाव नोंदणीसाठी होणारी गर्दी लक्षात  घेता  राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार मुदत वाढवून दिली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळू शकते. आधी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी काल (३१ ऑगस्ट) पर्यंत अंतिम मुदत होती. आतापर्यंत याची मुदत दोन वेळी वाढवली आहे. राज्यातील  अधिकाधिक महिलांना लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता  होती. याबाबत सरकारी निर्णय  जाहीर झाला असून आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यात वितरीत झाले आहेत. अडीच  लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना  १५०० रुपये दिले जातात.

महिलांना आता एकूण ४ हजार ५०० रुपये मिळणार -

लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून, आता ३० सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण ४ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.

राज्यातील काही भागात महिलांना अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकवेळी प्रयत्न करूनही त्यांचा अर्ज सबमिट झालेला नाही. याचा विचार करून सरकार या  योजनेसाठी अर्ज दाखल  करण्याची मुदत एका  महिन्याने  वाढवण्याची शक्यता आहे. कोणतीही पात्र महिला या योजनेतील लाभापासून वंचित राहू नये,  यासाठी सरकार  या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आणखी एका महिन्याने वाढवली आहे. .

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना रक्षाबंधनच्या चार दिवस आधी पहिल्या दोन महिन्यांचे म्हणजे ३००० रुपये बँक खात्यात जमा झाले. आतापर्यंत साधारण  दीड कोटी महिलांच्या  बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.  त्याचबरोबर पात्र महिलांपैकी ४० ते ४२ लाख महिलांच्या बँक खात्याला  त्यांचे आधार नंबर  लिंक  नसल्याने  त्यांना लाभ मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाकडून बँक सिडिंगची  प्रक्रिया वेगाने  राबवली जात आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. आधार बँकेशी लिंक झाल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल.