Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार? ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे-mukhyamantri mazi ladki bahin yojana third installment will be deposited in women accounts on 29 september ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार? ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार? ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे

Sep 23, 2024 04:41 PM IST

mazi ladki bahin yojana : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana third Installment : महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यभरातील महिलांकडून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारनेपात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे दोन हफ्ते म्हणजे ३००० हजार रुपये जमा केले आहेत. मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी तिसऱा हफ्ता जमा झाल्यामुळे महिलांकडून विचारणा होत होती. आता तिसरा हप्ता कधी मिळणार, याची तारीख समोर आली आहे. तिसऱ्या हफ्त्याबाबत महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

या तारखेला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार तिसरा हफ्ता -

येत्या २९सप्टेंबर रोजी महिलांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत येत्या २९सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाबाबत ताऱीख ठरवली जाऊ शकते. येत्या २९सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचा निर्णय झाल्यास रायगड जिल्ह्यात महिला मेळावा आयोजित केला जाऊ शकतो.

मंत्रीआदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगडमध्ये होणार आहे.या तिसऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत प्राप्त झालेल्याअर्जदार महिलांना लाभ वितरित करण्यात येतील. ज्या महिलांना अद्याप एकही हफ्ता मिळाला नाही त्यांना तीन हफ्ते एकदम दिले जातील. राज्यातील २ कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

तीन हप्त्यांचा एकत्रित लाभ

ज्या अद्याप एकही हफ्ता मिळाला नाही, किंवा ज्यांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता.अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित ४५०० रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत.

दरम्यान,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र नंतर राज्य सरकारने याच्या नोंदणीची तारीख पुढे वाढवत ती ३० सप्टेंबरपर्यंत केली आहे. यातच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात एकदम तीन महिन्याचे पैसे येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Whats_app_banner