लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार! ५५०० रुपयांचा बोनस मिळणार; तुम्ही आहात का पात्र? पाहा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार! ५५०० रुपयांचा बोनस मिळणार; तुम्ही आहात का पात्र? पाहा!

लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार! ५५०० रुपयांचा बोनस मिळणार; तुम्ही आहात का पात्र? पाहा!

Published Oct 15, 2024 04:35 PM IST

Ladki Bahin Yojana Diwali Bonus : महायुतीसरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलं आहे. राज्य सरकारनेदिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बोनस देण्याची मोठी घोषणा केली आहे.

लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसची घोषणा
लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसची घोषणा

Ladki Bahin Yojana Diwali Bonus :  निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र यापूर्वीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलं आहे. राज्य सरकारने दिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बोनस देण्याची मोठी घोषणा केली आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस म्हणून ३००० हजार रुपये जमा होणार आहेत. तसंच, काही निवडक महिलांना व तरुणींना २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.

दिवाळी बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या १५०० रुपयांव्यतिरिक्त  अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम देखील काही निवडक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात काही महिलांच्या खात्यात नियमित रक्कम वगळून ५५०० रुपये जमा होणार आहेत. 

सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. त्यातच  आता  राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे. 

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत पाच महिन्याचे हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले असून आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

दिवाळीचा बोनस मिळवण्यासाठी पात्रता काय?

लाडकी बहीण योजनेंतर्गत दिवाळीचा बोनस मिळवण्यासाठी महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवं. त्याचबरोबर महिलेने योजनेचा लाभ कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतलेला असावा. महिलांचे अधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेले पाहिजे. या अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना ३०००  रुपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. 

कोणत्या महिलांना अतिरिक्त २५०० रुपये मिळणार?

३००० रुपयांच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. हा अतिरिक्त लाभ दिव्यांग महिला, एकल माता, बेरोजगार महिला, दारिद्ररेषेखालील महिला, आदिवासी भागातील महिला यांना मिळणार आहे. यांना दिवाळी बोनस म्हणून ३००० हजार रुपये आणि अतिरिक्त २५०० हजार असे ५५०० रुपये जमा होणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर