Pune water issue : पुरानंतर पुणेकरांना गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा! पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune water issue : पुरानंतर पुणेकरांना गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा! पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Pune water issue : पुरानंतर पुणेकरांना गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा! पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Published Jul 29, 2024 01:13 PM IST

Muddy tap water in Pune : पुण्यात झालेल्या शहरात मुसळधार पावसामुळे नळाला दूषित आणि गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यावर पुणे महापालिकेने पिण्याचे पाणी पिण्यापूर्वी उकळून घेण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

पुरानंतर पुणेकरांना गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा! पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
पुरानंतर पुणेकरांना गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा! पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Muddy tap water in Pune : पुण्यात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. तब्बल ३२ वर्षानंतर पुणेकरांनी अतिवृष्टी अनुभवली. या पावसामुळे शहरातील काही भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या पुराचे पाणी ओसारल्यानंतर आता पुणेकरांपुढे नवे संकट उद्भवले आहे. पुणे पालिकेतर्फे नळाद्वारे पुरवण्यात येणारे पाणी हे दूषित, गढूळ आणि गाळयुक्त येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

पुण्यात झालेल्या शहरात मुसळधार पावसामुळे नळाला दूषित आणि गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. एकीकडे पुण्यात साथ रोगांनी थैमान घातले असतांना नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने आणखी रोगराई वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकारांवर मनपा पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता नंदकिशोर जटप यांनी नागरिकांना दूषित पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला आहे. जटप म्हणाले, नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी नागरिकांनी खबरदारी गयावी आरोग्याचा अतिरिक्त उपाय म्हणून घरगुती वापरासाठी पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे.

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दूषित पाणी प्यायल्याने पसरणाऱ्या जलजन्य आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.

दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, टायफॉईड ताप, हिपॅटायटीस यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी किंवा मनपा आरोग्य केंद्रांना सतर्क करा, असे आवाहन मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी केले आहे.

अतिसार, जुलाब, सर्दी किंवा ताप अशी लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळवंत यांनी केले आहे.

नागरिकांनी आपल्या इमारतींमधील भूमिगत आणि ओव्हरहेड अशा दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या कराव्या तसेच नळ किंवा व्हॉल्व्हमधील गळती दुरुस्त करून टाक्यांभोवती स्वच्छता ठेवावी, असे आवाहन देखील पालिकेच्या आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत यांनी केले आहे.nia

पुण्यात झिकाचा उद्रेक

पुण्यात झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रविवारी आणखी ९ जणांना झिकाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही ४८ झाली आहे. रविवारी आढळलेल्या ९ रुग्णांपैकी ७ रुग्ण पुणे महापालिका हद्दीत वाघोली, पुणे ग्रामीण आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर