Mumbai Trans Harbour Link: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटलबिहारी वाजपेयी शिवारी- न्हावा शेवा अटल सेतू या भारतातील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन झाले. मात्र, वाहनचालकांनी अटल सेतुला पिकनिक स्पॉट बनवल्याची माहिती समोर आली. अनेक प्रवासी अटल सेतूवर थांबून सेल्फी आणि फोटो काढत असल्याचे समजत आहे. याप्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आतापर्यंत एकूण १२० वाहनाचे चालान कापले आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून २० मिनिटांवर आले. पुलावरील वेगमर्यादा १०० किमी प्रतितास असल्याने कोणताही धोका पत्करायचा नाही. मात्र, तरीही अनेकजण वाहन थांबवून फोटोशूट करताना दिसत आहेत. एमएमआरडीएने मुंबई वाहतूक पोलिसांना अशा वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आवाहन केले.
मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू शुक्रवारी नागरिकांसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारले जात आहे.
या पुलाचे उद्घाटन करताना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या पूलामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुलाची पायाभरणीही करण्यात आली होती. एकूण १७ हजार ८४० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला. हा २१.८ किलोमीटर लांब आहे. तर, हा ६ लेनचा पूल आहे, ज्याची लांबी समुद्रावर सुमारे १६.५ किमी आहे. हा पूल जमिनीपासून सुमारे ५.५ किमी आहे.
संबंधित बातम्या