MSRTC: उद्यापासून ‘या’ दोन मार्गांवर धावणार एसटीच्या २० इलेक्ट्रिक बस
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MSRTC: उद्यापासून ‘या’ दोन मार्गांवर धावणार एसटीच्या २० इलेक्ट्रिक बस

MSRTC: उद्यापासून ‘या’ दोन मार्गांवर धावणार एसटीच्या २० इलेक्ट्रिक बस

Feb 13, 2024 05:13 PM IST

MSRTC Unveils 20 AC Electric Buses: एसटी महामंडळाच्या २० इलेक्ट्रिक बसचे आज अनावरण करण्यात आले.

MSRTC Electric Bus
MSRTC Electric Bus

MSRTC Electric Bus Launched: बोरिवली ते ठाणे आणि बोरिवली ते नाशिक मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उद्यापासून इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी एसी इलेक्ट्रिक बस सेवा सुरु झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री आणि एसची महामंडळाचे अध्यक्ष एकनाश शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे येथील खोपट बसस्थानकावर इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले.

एसटी महामंडळाने ५१५० एसी इलेक्ट्रिक बसचा घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्थानके निर्माण केली जात आहेत. या प्रकल्पाची सुरूवात बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर या बसेस सुरू करण्यात येत आहे.

३४ आसनी, एसी इलेक्ट्रिक बसचा उद्यापासून बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार आहे. या बसचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी बस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे, या बसमध्ये महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात १०० टक्के सवलत मिळणार आहेत.

आज लॉन्च करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसच्या आरक्षणासाठी प्रवाशी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच एसटी महामंडळाच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट बूक करता येणार आहे. या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर