MSRTC ST Fare hike : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहे. महायुतीसरकार देखील स्थानप झाले आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यावर आता भाववाढीची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर येऊन पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचवणारी बातमी पुढे आली आहे. एसटी महामंडळाने तब्बल १४.९५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे. या निर्णयावर सरकार अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.
राज्यात एसटी महामंडळाने नागरिक प्रामुख्याने प्रवास करत असतात. सध्या बसमध्ये महिलांना अर्ध्या किमतीत तर वृद्ध नागरिकांना मोफत प्रवास आहे. मात्र, आता एसटी महामंडळाने राज्य सरकारला तब्बल १४.९४ टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव निवडणुकीपुर्वी सादर करण्यात आला होता. मात्र, शिंदे सरकारने या बाबत कोणताही निर्णय दिला नव्हता. आता निवडणुका होऊन नवे सरकार स्थापन झाले आहे. नवे सरकार स्थापन होताच एसटी भाड्याच्या वाढी संदर्भात मागणी करण्यात आईल आहे.
या बाबत भरत गोगावले म्हणाले की, गरीब लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्याच्या कानकोऱ्यात लालपरी सेवा असून महामंडळाकडे बसे गाड्यांची संख्या कमी आहेत. नव्या वर्षांत ३ ते ३५०० नव्या बसेस घेणार असून यातील काही नवीन बसेस भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहे. नव्या बसेस आल्यावर जुन्या बसेस स्क्रॅप केल्या जाणार आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढही करण्यात आली होती. महामंडळाने गेल्या ३ वर्षांपासून कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे आता ही भाडेवाढ केली जाणार आहे. आम्ही १४.९४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल.
सध्या महामंडळाला मोठा तोटा होत आहे. साधारण १५ कोटी रुपयांचे रोजचे नुकसान एसटी महामंडळाला होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सध्या महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढते असून त्यांना ते वेळेत देण्याचे आवाहन महामंडळापुढे असते. या सोबतच वाढते इंधन दर डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे महामंडळाने तिकिट दर व भाडेवाढ करण्याचा प्रस्तावाला नवे सरकार मंजूरी देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.