मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MSRTC : एसटी बसमधून प्रवास करताना आता सुट्ट्या पैशांची चिंता सोडा, ऑनलाइन पेमेंटने काढता येणार तिकीट

MSRTC : एसटी बसमधून प्रवास करताना आता सुट्ट्या पैशांची चिंता सोडा, ऑनलाइन पेमेंटने काढता येणार तिकीट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 11, 2023 08:31 PM IST

Book Tickets by online Payment : एसटी बसमधून प्रवास करताना आता सुट्ट्या पैशांच्या अभावी वाहकासोबत वादाचे प्रकार घडणार नाहीत, कारण महामंडळाने ऑनलाईन पेमेंटची सोय करून दिली आहे.

MSRTC
MSRTC

सर्वसामान्यांची लालपरी असणारी एसटी बस ग्रामीण भागात वाहतुकीचे मुख्य साधन आहे. एसटी बसने अनेक सवलती जाहीर करत प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही बसमधून प्रवास करताना सुट्ट्या पैशांची समस्या निर्माण होते. अनेकदा वाहकासोबत प्रवाशांचा वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या नव्या योजनेमुळे सुट्ट्या पैशांची समस्या थोडी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कारण बसमध्ये आता ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सध्या डिजिटलची सवय झाल्याने अनेक प्रवासी घाईगडबडीत एसटी बसमध्ये चढतात. मात्र सुट्टे पैसे नसल्याने वाहकासोबत वादाचे प्रकार होतात. मात्र आता एसटीच्या तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सध्याचा जमाना युपीआय पेमेंटचा असल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण डेबिट कार्ड व युपीआयमधून छोटे-मोटे पेमेंट करत असतो. त्यामुळे अनेकांच्या खिशात पैसे नसतात. त्यात सुट्ट्या पैशांची समस्या याहून मोठी. याची जाणीव एसटी तून प्रवास करताना होत असते. आता  एसटी महामंडळानेही ऑनलाइन तिकिटाची सुविधा सुरू केल्याने तिकीटांसाठी सुट्ट्या पैशांच्या वादातून एसटी सुटली आहे. त्याच धर्तीवर एसटीने बसमधून प्रवास करतानाही त्याक्षणीचे तिकीटही ऑनलाइन पेमेंट करून देण्याची सोय उपलब्ध केली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाने डिजिटल पेमेंटीची सुविधा सुरू केली आहे. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशांसाठी होणारी कटकट मिटली आहे.

IPL_Entry_Point

विभाग