MSRTC Bus Pass : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! आता शाळा-महाविद्यालयातच मिळणार एसटीचा पास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MSRTC Bus Pass : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! आता शाळा-महाविद्यालयातच मिळणार एसटीचा पास

MSRTC Bus Pass : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! आता शाळा-महाविद्यालयातच मिळणार एसटीचा पास

Updated Jun 16, 2024 05:40 PM IST

MSRTC Student Bus Pass : राज्यातीलअनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. आता शालेय पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळांमधूनच पास वितरीत केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास
विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास

Students ST Bus Pass : राज्यातील विदर्भ वगळता अन्य विभागातील शाळा शनिवारपासून सुरु झाल्या आहेत. शाळा सुरू होताच राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचा पास काढण्यासाठी बसस्थानात रांगेत उभे रहावे लागणार नाही. त्यांना आता ते शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा महाविद्यालयात एसटीचे पास वितरित केले जाणार आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी ही माहिती दिली असून स्थानिक एसटी प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातीलअनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो.आता शालेय पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळांमधूनच पास वितरीत केले जाणार आहेत.

एसटी प्रशासनातर्फे १८ जून पासून'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. एसटीच्या या अभिनव योजनेचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. दरवर्षी राज्यात लाखो विद्यार्थी रोज एसटी बसने शाळेत ये-जा करतात. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे त्यांना केवळ ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बसस्थानकात, एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास काढावा लागतो. मात्र यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.स्थानिक एसटी प्रशासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर