ST Bus Fare Hike: प्रवाशांना फटका; एसटीकडून दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या वाढ?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST Bus Fare Hike: प्रवाशांना फटका; एसटीकडून दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या वाढ?

ST Bus Fare Hike: प्रवाशांना फटका; एसटीकडून दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ जाहीर, जाणून घ्या वाढ?

Updated Nov 03, 2023 11:16 PM IST

MSRTC bus fare hike : महसूल वाढवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे.

MSRTC bus fare hike
MSRTC bus fare hike

ST bus fare Hike : ऐन दिवाळीत राज्यातील जनतेला बस भाडेवाढीची झळ बसणार आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार,महसूल वाढीच्या दृष्टीने एसटीने दरवर्षीप्रमाणे परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. परिवर्तन, शिवसेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली आहे.

एसटीकडून दिलेल्या माहितीनुसार ही हंगामा भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून२७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच,ज्या एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३८७ कोटींची मदतदिली आहे. या आर्थिक मदतीमुळेएसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत कर्मचाऱ्यांनी वेतन मिळणार आहे.

यापूर्वीराज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजाराचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच सण अग्रिम म्हणून साडे बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यातच आताराज्य सरकारने एसटी महामंडळाला ३८७ कोटींची मदत केल्यानं एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी वेतन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर