MPSC Interview Dates : एमपीएससी परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर, इथं पाहा वेळापत्रक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Interview Dates : एमपीएससी परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर, इथं पाहा वेळापत्रक

MPSC Interview Dates : एमपीएससी परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर, इथं पाहा वेळापत्रक

Updated Dec 28, 2023 06:03 PM IST

MPSC Exams Interview dates News : २०२२ मध्ये झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

MPSC Exams Interview
MPSC Exams Interview

MPSC Interview Dates : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करता येईल. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, राज्य सेवा परीक्षा २०२२ साठी मुलाखतीची पाचवी फेरी २ जानेवारी २०२४ पासून घेतली जाईल.

राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखती २ ते ५ जानेवारी २०२४ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीची ठिकाणं अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.

MPSC राज्य सेवा मुलाखतींचं वेळापत्रक पाहण्यासाठी इथं क्लिक करा!

राज्य सेवा परीक्षा २०२२ च्या निवड प्रक्रियेनुसार, मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील मुलाखत फेरीत उपस्थित राहावं लागेल. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार वेळापत्रक तपासू शकतात आणि त्यांना रोल नंबर, मुलाखतीची तारीख आणि वेळेनुसार उपस्थित राहावं लागेल.

सकाळी ८.३० आणि १०.३० वाजता मुलाखती होणार आहेत. उमेदवारांनी आपापल्या वेळेवर उपस्थित राहावं. अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या रोल नंबर आणि नावानुसार उमेदवार मुलाखतीची तारीख आणि वेळ पाहू शकतात.

Maratha Reservation: मनोज जरांगे ‘या’ मार्गाने मुंबईत धडकणार; मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग ठरला!

असं पाहा वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील Latest Updates Section या लिंकवर क्लिक करा.

मुख्यपृष्ठावरील Adv.No.099/2022 - State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - 5) या लिंकवर क्लिक करा.

होम पेजवर तपशीलवार वेळापत्रकारची PDF मिळेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर