मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Exam: एमपीएससीच्या ३४० जागांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

MPSC Exam: एमपीएससीच्या ३४० जागांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 18, 2022 07:54 PM IST

MPSC Exam: एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ ही २१ ऑगस्टला होणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये या परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाईल.

MPSC
MPSC (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३४० नव्या जागांच्या भरतीची घोषणा केली आहे. यात अ आणि ब गटातील पदांचा समावेश आहे. एमपीएससीने १६१ संवर्गाच्या भरतीसाठी याआधी ११ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यातच आता नव्याने ३४० पदे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे आता एकूण ५०१ जागांसाठी भरती होणार आहे. यात उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, शिक्षणाधीकारी, तहसीलदार, सहायक गट विकास अधिकारी यांच्यासह विविध पदांचा समावेश आहे.

एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ ही २१ ऑगस्टला होणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये या परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाईल. यासाठी राज्यातील ३७ जिल्ह्यांतील केंद्रात परीक्षा घेतली जाईल. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५४४ रुपये इतके शुल्क आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना यासाठी ३४४ रुपये इतकं शुल्क भरावं लागेल.

परीक्षेसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल. यामध्ये आरक्षित वर्गाला कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल. पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतील. याशिवाय शैक्षणित पात्रता, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा यासह इतर माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा

1) गट - अ

उपजिल्हाधिकारी (33)

पोलीस उपअधीक्षक (41)

सहायक राज्यकर आयुक्त (47)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (14)

उपनिबंधक,सहकारी संस्था (2)

शिक्षणाधिकारी (20)

प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) (6)

तहसीलदार (25)

2) गट - ब

सहायक गट विकास अधिकारी (80)

उपअधीक्षक,भूमी अभिलेख (3)

सहायक निबंधक,सहकारी संस्था (2)

उपशिक्षणाधिकारी (25)

सहायक प्रकल्प अधिकारी (42)

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या