मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Exam : 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी MPSCचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC Exam : 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी MPSCचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 28, 2022 01:48 PM IST

एमपीएससीने आता २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. मार्च ते जून या कालावधीत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

MPSC Exam
MPSC Exam

राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेते. राज्यात मोठ्या संख्येनं सरकारी भरतीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार याची तयारी करत असतात. एमपीएससीने आता २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. मार्च ते जून या कालावधीत विविध पदांसाठी पूर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबत सविस्तर अंदाजित वेळापत्रक आयोगाने जारी केलं आहे.

मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सत्र व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गच्या पदांसाठी पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जाईल. तर जुलै दरम्यान मुख्य परीक्षा होऊ शकते. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षेची पूर्व परीक्षा एप्रिलअखेर तर मुख्य परीक्षा सप्टेंबरच्या सुरुवातीला होईल.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रीत परीक्षा २०२३ ची पूर्व परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. तर मुख्य परीक्षा सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात होऊ शकेल.

एमएपएससीने जाहीर केलेलं हे वेळापत्रक अंदाजित आहे. जाहिरातीच्या किंवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना, दिनांक यामध्ये बदल होऊ शकते. असे बदल झाल्यास ते आयोगाच्या संकेतस्थळावप प्रसिद्ध केले जातील. संबंधित परीक्षेचं नियोजन, निवड पद्धत याबाबतचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. यात पुढे काही बदल करण्यात आला तर ते अपडेट केले जातील असंही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग