MPSC: शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप, राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात पहिला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC: शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप, राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात पहिला

MPSC: शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप, राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात पहिला

Published Jan 19, 2024 10:07 AM IST

MPSC Mains Exam 2022 General Merit List: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये कोल्हापूरचा विनायक पाटील पहिला आला आहे.

mpsc exam 2022 final result declared
mpsc exam 2022 final result declared

MPSC Results 2023 Declared: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी (१८ जानेवारी २०२३) जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, पात्र उमेदवारांच्या मुलाखती संपताच अवघ्या एका तासात निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६१३ पदांसाठी घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी, डीव्हायएसपी तहसीलदार या संवर्गातील जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. या निकालात विनायक पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर, धनंजय बांगर आणि सौरभ गावंडे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.

राज्यात पहिला आलेल्या विनायक पाटलांची प्रतिक्रिया

“राज्यात पहिला आल्याचा खूपच आनंद झाला. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे. माझे आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून माझी उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली. मी संख्याशास्त्र विषयात फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे.”

मुलाखातीनंतर तासाभरात निकाल जाहीर

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासात सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.

परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया येत्या २२ जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्गपदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदावरील निवडीसाठी इच्छुक आहे, केवळ त्याच पदासाठी पसंतीक्रम सादर करावे लागतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर