चाकण प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन! एमपीसीबीची मर्सिडीज-बेंझ कंपनीला कारणे दाखवा नोटीस-mpcb serves notice to mercedes benz for environmental norms violations at chakan plant ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चाकण प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन! एमपीसीबीची मर्सिडीज-बेंझ कंपनीला कारणे दाखवा नोटीस

चाकण प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन! एमपीसीबीची मर्सिडीज-बेंझ कंपनीला कारणे दाखवा नोटीस

Sep 22, 2024 12:26 PM IST

MPCB serves notice to Mercedes-Benz : एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी चाकण येथील मर्सिडीज बेंझ प्रकल्पाला भेट दिल्यानंतर महिनाभरानंतर शुक्रवारी पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

चाकण प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमपीसीबीची मर्सिडीज-बेंझला नोटीस
चाकण प्रकल्पात पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमपीसीबीची मर्सिडीज-बेंझला नोटीस

MPCB serves notice to Mercedes-Benz : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) मर्सिडीज बेंझ कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पाला पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर महिनाभरानंतर शुक्रवारी त्यांनी ही नोटीस बजावली आहे.

एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मर्सिडीज बेंझ प्रकल्पाला भेट महिन्या भरपूर्वी भेट दिली होती. या भेटीनंतर बोर्डाने सोशल मीडियावरील महत्त्वाच्या पोस्ट डिलीट केल्याने तपासणी व कारवाई बाबत दिरंगाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या बाबत विरोधी पक्षनेत्यांनी टीका केली होती.

काय आहे नोटीसीमध्ये ?

प्रदूषण नियंत्रणाच्या महत्त्वाच्या उपाययोजनांचे पालन करण्यात प्रकल्प अपयशी ठरल्याने पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे या नितीशीत म्हटलं आहे. प्रक्रिया न केलेले व अर्धवट प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडणे, हवेचे प्रदूषण व कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले उपकरणे अद्ययावत नसणे अशा अनेक मुद्द्यांचा समावेश या नोटीशीत करण्यात आला आहे.

उत्तर देण्यासाठी कंपनीला १५ दिवसांची मुदत

एमपीसीबीने मर्सिडीज बेंझ कंपनीला या उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या बाबत उत्तर न दिल्यास तसेच एमपीसीबीच्या सुचनांचे पालन न केल्यास जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४ आणि वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील नोटीशीत म्हटलं आहे.

मर्सिडीज बेंझ इंडियाने एमपीसीबीकडून पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'एमपीसीबीकडून तीन आठवड्यांनंतर आज पत्र आले आहे. आम्ही त्याबाबत योग्य ती कारवाई करत असून या नोटीसील योग्य प्रतिसाद देऊ व अधिकाऱ्यांना सहकार्य करू, असे कंपनीने म्हटलं आहे.

एमपीसीबी पुणेचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी २३ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी कारखान्याची पाहणी केल्यानंतर नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले आहे. साळुंखे म्हणाले, 'मंडळाने दिलेल्या संमतीने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्यात कंपनी अपयशी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रक्रिया न केलेले व अंशत: प्रक्रिया केलेले सांडपाणी व प्रदूषणास करणी भूत ठरणारे वायू उत्सर्जन होत आहे.

या पाहणीदरम्यान लक्षात आलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रकल्पाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (ईटीपी) सेंट्रीफ्यूज युनिट कार्यान्वित नव्हते. तसेच कंपनीत रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) रिजेक्टवर उपचार करण्यासाठी आवश्यक मल्टी इफेक्ट बाष्पीभवन (एमईई) व उत्तेजित थिन फिल्म ड्रायर (एटीएफडी) कंपनीत नव्हते.

काहींनी एमपीसीबीच्या धोरणावर टीका करत प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. २३ ऑगस्टच्या पाहणीनंतर बोर्डाने एक्सवर पोस्ट केले होते की मर्सिडीज-बेंझचा चाकण प्रकल्प "प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याचे आढळले." नंतर या पोस्ट डिलीट करण्यात आल्याने बोर्डावर टीका करण्यात आली होती.

याबाबत एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यानं या नोटिशीबाबत काही माहिती नसल्याचे दिसले. मर्सिडीज-बेंझला नोटीस बजावण्यात आल्याची मला माहिती नाही व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Whats_app_banner
विभाग