Motorola Edge 50 Ultra vs HONOR 200 Pro 5G: मोटोरोला एज ५० अल्ट्रा आणि ऑनर २०० प्रो 5G ने भारतीय मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात प्रवेश केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ चिपसेट आणि अॅडव्हान्स कॅमेरा सिस्टीम देण्यात आली. ऑनर २०० प्रो 5G नुकताच ऑनर २०० 5G जी सोबत लॉन्च करण्यात आला आहे. मोटोरोला एज ५० अल्ट्रामध्ये पेरिस्कोप टेलिफोटो लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील समाविष्ट आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सची तुलना करुयात.
मोटोरोला एज ५० अल्ट्रा पीच फ्यूझ आणि फॉरेस्ट ग्रेमध्ये शाकाहारी लेदर फिनिश किंवा नॉर्डिक वूडमध्ये लाकडी पॅनेल प्रदान करते. यात अॅल्युमिनियम फ्रेम आहे, त्याची जाडी ८.५९ मिमी आहे, वजन १९७ ग्रॅम आहे. ऑनर २०० प्रो 5G ओशन सायन आणि ब्लॅकमध्ये येतो, ज्यात ग्लास बॅकसह अल्ट्रा-स्लिम डिझाइन आहे. याची जाडी ८.२ मिमी आहे, ज्याचे वजन १९९ ग्रॅम आहे.
मोटोरोला एज ५० अल्ट्रामध्ये 1.5K रिझोल्यूशनसह ६.७ इंच पीओएलईडी डिस्प्ले, १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन आहे. या तुलनेत ऑनर २०० प्रो 5G मध्ये एफएचडी+ रिझोल्यूशन सह ६.७८ इंचाचा क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
मोटोरोला एज ५० अल्ट्रामध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, ऑटोफोकससह ५० एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ३ एक्स ऑप्टिकल झूम आणि १०० एक्स डिजिटल झूमसह ६४ एमपी पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५० एमपी फ्रंट कॅमेरा आहे. ऑनर २०० प्रो 5G मध्ये ५० एमपी सुपर डायनॅमिक एच ९०० प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ऑटोफोकससह १२ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ५० एमपी सोनी आयएमएक्स ८५६ टेलिफोटो कॅमेरा. यात ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा थ्रीडी डेप्थ सेन्सर देण्यात आला. मोटोरोला एज ५० अल्ट्रा हा फोन ऑनर २०० प्रो 5G च्या तुलनेत त्याच्या अल्ट्रावाइड आणि टेलिफोटो कॅमेऱ्यांमध्ये जास्त रिझोल्यूशन प्रदान करते.
मोटोरोला एज ५० अल्ट्रामध्ये १२५ वॅट टर्बोपॉवर वायर्ड चार्जिंग, ५० वॅट वायरलेस चार्जिंग आणि १० वॅट रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट करणारी ४ हजार ५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वायर्ड चार्जिंगने अवघ्या अर्ध्या तासाच्या आत फुल चार्ज होतो. ऑनर २०० प्रो 5G मध्ये १०० वॅट ऑनर सुपरचार्ज वायर्ड चार्जिंगसह ५ हजार २०० एमएएचची सिलिकॉन बॅटरी मिळते, जी अवघ्या १५ मिनिटांत ५० टक्केपर्यंत चार्ज होते.
१२ जीबी रॅमसह मोटोरोला एज ५० अल्ट्राची किंमत समान कॉन्फिगरेशनसह ऑनर २०० प्रो 5G पेक्षा किंचित कमी आहे, ज्याची किंमत अनुक्रमे ५७ हजार ९९९ रुपये आणि ५९ हजार ९९९ रुपये आहे.