SCC Exam: रस्ता ओलांडताना कारच चाक पायवरून गेल्यानंतर इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनीच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र, तरीही या विद्यार्थीनीने जिद्द सोडली नाही. तिने थेट रुग्णवाहिकेत दहावीचा पेपर दिला. मुबश्शिरा सय्यद असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी मुबश्शिरा परीक्षा लिहून घरी जात असताना एक कार तिच्या पायावरून गेली. ज्यात तिला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मिळालेल्या महितीनुसार, मुबश्शिरा सय्यद (वय, १५) ही वांद्रे येथील अंजुमन-इ-इस्लामच्या डॉ एमआयजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. मुबश्शिराचे वांद्रेच्या सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल येथे परीक्षा केंद्र लागले असून ती शुक्रवारी दुपारी विज्ञान २ चा पेपर लिहल्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घरी जात होती. त्यावेळी रस्ता ओलांडताना एका कारचे चाक तिच्या पायावरुन गेले. कारचालकाने आणि तिच्या मैत्रिणींनी तिला त्वरील जवळच्या होली फॅमिली रुग्णालयात नेले, जिथे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला डॉक्टरांनी रविवारी डिस्चार्ज दिला आणि दोन आठवडे पूर्ण विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. उर्वरीत पेपर देता येणार नसल्याने मुबश्शिरा निराश झाली होती. परंतु, थेट रुग्णवाहिकेत तिला पश्न पत्रिका आणि लेखक मिळाल्याने तिचा आत्मविश्वास वाढवला. तिला दहावीचा पेपर देता आल्याने तिचा आनंद गगणात मावनेसा झाला.
“ परीक्षेला बसायला मिळाल्याचा मला आनंद आहे. पण स्वत: पेपर सोडवणे आणि दुसऱ्याने तुमची उत्तरे लिहिने यात खूप फरक असतो. पण मिळालेली संधी मला सोडायची नव्हती", अशी प्रतिक्रिया मुबश्शिरा सय्यदने दिली आहे. मुबश्शिराची येत्या २३ मार्चला सामाजिक विज्ञान १ आणि २५ मार्चला सामाजिक विज्ञान २ या दोन विषयांची परीक्षा होणार आहे. शेवटचे या दोन्ही विषयांची प्रश्नपत्रिका तिला रुग्णवाहिकेतच सोडवायच्या आहेत.