मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दर्शनाविना घरी गेलेल्या मुलीनं केली होती आत्महत्या, २ वर्षांनी लालबाग राजाच्या चरणी आईचं भावुक पत्र

दर्शनाविना घरी गेलेल्या मुलीनं केली होती आत्महत्या, २ वर्षांनी लालबाग राजाच्या चरणी आईचं भावुक पत्र

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 02, 2022 09:58 AM IST

Lalbaugcha Raja: आईने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत २०१९ मध्ये मी आणि माझी मुलगी ८ तास उभा राहिलो. पण रांग जराही पुढे सरकली नव्हती.

लालबागचा राजा चरणी आईचे भावूक पत्र
लालबागचा राजा चरणी आईचे भावूक पत्र

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला राज्यातील भाविक दरवर्षी मोठी गर्दी करतात. यामुळे दर्शनासाठी मोठी रांगही लागते. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला राजकीय नेते, सेलिब्रिटी यांच्यासह सर्वसामान्यांची संख्या मोठी असते. दर्शनाला येणारे भाविक लालबागच्या राजाच्या नवसपेटीत अनेक पत्रंही टाकत असतात. यातच दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईचं पत्र चर्चेत आहे. वाशीत राहणाऱ्या या महिला भाविकाने लालबाग राजाच्या चरणी पत्र लिहीत एक मागणी केलीय.

वाशीत राहणाऱ्या महिलेच्या मुलीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुलगी आईसह आली होती. तेव्हा दर्शनाच्या रांगेत जवळपास ८ तास उभा रहावं लागलं होतं. त्यावेळी मुलीचा आणि तिथे असणाऱ्या गार्डचा वाद झाला होता. गार्डशी झालेल्या वादानंतर मुलीने आईला घेऊन तिथून घर गाठले होते. त्यानंतर सांयकाळी आत्महत्या केली होती. आता दोन वर्षांनी आईने लालबाग राजाच्या चरणी एक भावूक पत्र लिहिलं आहे.

आईने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत २०१९ मध्ये मी आणि माझी मुलगी ८ तास उभा राहिलो. पण रांग जराही पुढे सरकली नव्हती. त्यामुळे मुलीचे पाय दुखत होते. तेव्हा मुलगी तिथे ड्युटीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकासोबत बोलायला गेली. तेव्हा त्याने मुलीला मनाला लागेल असे काहीतरी बोलला. त्याने चुकीच्या भाषेत दिलेल्या उत्तराने माझ्या मुलीला मानसिक धक्का बसला. त्यानंतर रांगेतून बाहेर पडत ती मला घरी घेऊन गेली. मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं आणि संध्याकाळीच तिने गळफास घेत आत्महत्या केली."

पत्रात मुलीने तेव्हा काढलेलं एक चित्रही दाखवलं आहे. नवसाच्या रांगेत भाविकांना खुर्च्या द्याव्यात अशी मागणी या चित्रातून केली होती. आता आईने पत्रातून हीच मागणी करताना नवसाच्या रांगेतील भाविकांना खुर्च्या द्याव्यात, म्हणजे तिच्या आत्म्याला शांती मिळेल असं पत्रात म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या