मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Virar Murder: विरारमध्ये दारुड्या जावयाकडून सासूची हत्या; हातपाय बांधून मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार

Virar Murder: विरारमध्ये दारुड्या जावयाकडून सासूची हत्या; हातपाय बांधून मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार

Jun 20, 2024 09:14 AM IST

Virar Man Kills Mother-in-law: विरारमध्ये एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून सासूची हत्या केली. याप्रकरणी विरार पोलिसांनी एकास अटक केली.

विरारमध्ये जावयाकडून सासूची हत्या
विरारमध्ये जावयाकडून सासूची हत्या

Virar Crime: विरारमध्ये घरगुती वादातून आपल्या सासूची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या दिवशी आरोपी दारूच्या नशेत होता, अशीही माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु, आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने तो पकडला गेला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत खैरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या काही दिवसांपासून पत्नी कल्पना, दोन मुले आणि सासू यांच्यासोबत भाड्याच्या घरात राहत होता. प्रशांतला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा दारूच्या नशेदत पत्नी आणि सासू लक्ष्मी खांबे यांना शिवीगाळ करायचा. दरम्यान, बुधवारी कल्पना काही कामानिमित्त बाहेर गेली असताना आरोपीचे लक्ष्मी यांच्यासोबत भांडण झाले. यानंतर राग अनावर झाल्याने प्रशांतने लक्ष्मी यांचे हात पाय बांधले आणि तिच्या मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत लक्ष्मी यांचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय आहे.

सासूची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्याच्या तयारीत होत. परंतु, त्याच्या मुलांनी बाहेरून घराची कडी लावून त्याला आत कोंडून ठेवले आणि आरडाओरडा करून आजूबाजुच्या लोकांना याबाबत माहिती दिली. यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत विरार पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घऊन पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नवी मुंबई: अवघ्या १२५० रुपयांसाठी सुपरवायझरची हत्याा

नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात १२५० रुपये थकबाकी न दिल्याच्या वादातून एका मजुराने सुपरवायझरची हत्या केली.ही घटना नवी मुंबईतील कळंबोलीच्या सेक्टर १४ येथे शुक्रवारी रात्री उशीरा घडली. या घटनेनंतर फरार झालेला आरोपीला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली, जिथून तो त्याच्या गावी पळून जाण्याच्या बेतात होता. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत. परवेझ अन्सारी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, सद्दाम अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

WhatsApp channel
विभाग