Chandrapur mother suicide : चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या पोटच्या मुलीला विहिरीत ढकलुन देत स्वत: ही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, मुलालाही आई विहिरीत ढकलणार होती. मात्र, त्याने आई बहिणीला विहीरत धक्का देत असतांना पाहिल्याने त्याने पळ काढला. यामुळे तो बचवला. ही घटना चंद्रपुर तालुक्यातील सावली येथील खेडी गावात बुधवारी घडली.
दर्शना दीपक पेटकर (वय ३५) असे आईचे तर समीक्षा दीपक पेटकर (वय १३ ) असे मृत मुलीचे नाव आहे. दर्शना यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी दर्शना या त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन खेडी येथील त्यांच्या शेतात गेल्या. त्यांनी शेतातील विहिरीजवळ जात आधी मुलीला विहिरीत ढकलून दिले. यावेळी बहिणीला विहिरीत ढकलतांना पहिल्याने मुलाने पळ काढला.
आई त्याच्या मागे धावली पण तो पळून गेला. यानंतर दर्शना यांनी स्वतः विहिरीत उडी घेतली आणि आत्महत्या केली. ही घटना पळून गेलेल्या मुलाने गावातील नागरिकांना सांगितली. ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना सांगून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह विहिरी बाहेर काढले असून त्यांनी ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पुणे :सिंहगड रस्ता परिसरात चोरट्यांनी दोन महिलांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला कॅनोल रस्ता परिसरातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. ज्येष्ठ महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरघाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करत आहेत. नऱ्हे परिसरात अभिनव काॅलेज परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांंनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे भागात राहायला आहे. मंगळवारी सकाळी ्ाठच्या सुमारास महिला अभिनव महाविद्यालय परिसरातून निघाली होती. चोरट्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावू नेले. पोलीस उपनिरीक्षक अशोक सणस तपास करत आहेत.
संबंधित बातम्या