Nagpur Crime : पतीशी भांडणानंतर महिलेने ३ वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या, मृतदेहासोबत भटकत राहिली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Crime : पतीशी भांडणानंतर महिलेने ३ वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या, मृतदेहासोबत भटकत राहिली

Nagpur Crime : पतीशी भांडणानंतर महिलेने ३ वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या, मृतदेहासोबत भटकत राहिली

Updated May 22, 2024 08:10 PM IST

Mother Killed Daughter : पती-पत्नीमधील वादातून महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली व मृतदेह घेऊन ती ४ किलोमीटरपर्यंत भटकत राहिली.

 महिलेने ३ वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या
 महिलेने ३ वर्षाच्या चिमुकलीची केली हत्या

Mother killed daughter : नागपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात आपल्यात तीन वर्षाच्या मुलीची गळा घोटला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या केल्यानंतर महिलेने मुलीचा मृतदेह घेऊन जवळपास ४ किलोमीटरपर्यंत भटकत राहिली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना सोमवारी रात्री नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात झाली. आरोपी महिलेचे नाव ट्विंकल राउत (२३ वर्षे) असे आहे. राम लक्ष्मण राउत (वय २४) असे पतीचे नाव आहे. रोजगाराच्या शोधात ४ वर्षापूर्वी नागपूरमध्ये आले होते. हे जोडपे एका कागद बनवण्याच्या कंपनीत काम करत होते व एमआयडीसी परिसरात हिंगना रोडवर कंपनीच्या जवळ एका खोलीत रहात होते. 

पती-पत्नीमध्ये नेहमी होत होता वाद - 
पोलिसांनी सांगितले की, या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयातून नेहमी वाद होत होते. सोमवारी सायंकाळी चार वाजता या दाम्पत्यामध्ये पुन्हा वाद झाला. दोघांच्या भांडणात त्यांची मुलगी रडू लागली. त्यानंतर रागाच्या भरात महिला मुलीला घेऊन घराबाहेर गेली व एका झाडाखाली तिने मुलीची गळा दाबून हत्या केली.

रात्रीच्या वेळी मृतदेह घेऊन फिरत राहिली - 
पोटच्या मुलीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहासोबत महिला जवळपास ४ किलोमीटरपर्यंत पायी चालत गेली. पोलिसांनी सांगितले की, महिलेने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिने पोलिसांचे गस्ती वाहन पाहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस आधी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली व तिच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

नागपुरात ३ वर्षांच्या चिमूकल्याचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू -

नागपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मौदा येथे भटक्या कुत्र्याने एका तीन वर्षीय मुलावर हल्ला करत त्याच्या शरीराचे लचके तोडले. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी मौदा शहरातील गणेश नगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर