Dhule Suicide : मुंबईला जातो असं शेजाऱ्याला सांगून कुटुंबानं संपवलं जीवन; धुळ्यातील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhule Suicide : मुंबईला जातो असं शेजाऱ्याला सांगून कुटुंबानं संपवलं जीवन; धुळ्यातील धक्कादायक घटना

Dhule Suicide : मुंबईला जातो असं शेजाऱ्याला सांगून कुटुंबानं संपवलं जीवन; धुळ्यातील धक्कादायक घटना

Published Sep 19, 2024 02:52 PM IST

Dhule Suicide : नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना आता धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

मुंबईला जातो असं सांगून कुटुंबानं संपवलं जीवन; धुळ्यातील धक्कादायक घटना
मुंबईला जातो असं सांगून कुटुंबानं संपवलं जीवन; धुळ्यातील धक्कादायक घटना

Dhule Suicide : नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही घटना प्रमोद नगर येथे घडली. त्यांनी हे पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

दोन दिवसांपूर्वी त्यांनी शेजाऱ्यांना मुंबईला जातो असे सांगितले होते. मात्र, मुंबईत न जाता घरातच चौघांनी कीटकनाशक पिऊन जीवन संपवलं. प्रवीण मानसिंग गिरासे, पत्नी दीपा प्रवीण गिरासे, मुलगा मितेश प्रवीण गिरासे व दूसरा मुलगा सोहम प्रवीण गिरासे अशी मृत सर्वांची नावे आहेत. प्रवीण गिरासे यांचे धुळ्यात फर्टिलायझरचे दुकान आहे. गिरासे हे त्यांची पत्नी व दोन मुलांसोबत प्रमोद नगर येथे राहत होते. दरम्यान, मंगळवारी त्यांनी मुलांच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे शेजारी नागरिकांना सांगितले. मात्र, मंगळवारपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. यामुळे नागरिकांना शंका आली. दरम्यान, आज प्रवीण यांची बहीण ही सकाळी त्यांच्या घरी आली. 

यावेळी घरचा दरवाजा उघडाच असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्या आत गेल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. सर्वांचे मृतदेह हे बेडवर पडले होते. हे पाहून त्यांनी टाहो फोडला. त्यांच्या आवाजाने शेजारी देखील घरात आले. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्वांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याच्या अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे करण समजणार आहे. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी दोन मुलांसह आत्महत्या का केली ? याचा सोध पोलिस घेत आहेत.

नाशिकमध्ये बॉश कंपनीच्या कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या

नाशिकमधील गौळने गावातील बॉश कंपनीत काम करणाऱ्या एकाने पत्नी व मुळीसह आत्महत्या केली. विजय सहाने असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली होती. सहाने यांनी पत्नी व ९ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर