मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Police: महाराष्ट्रात ११३६ कॉन्स्टेबल पदांसाठी ५६ हजारांहून अधिक अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Police: महाराष्ट्रात ११३६ कॉन्स्टेबल पदांसाठी ५६ हजारांहून अधिक अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती

Jun 17, 2024 07:29 PM IST

Maharashtra Police Constable Recruitment: येत्या १९ जून २०२४ या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पदांसाठी ठाणे, मीरा भाईंदर वसई विरार, पालघर आणि नवी मुंबई युनिटसाठी भरती होणार आहे.
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पदांसाठी ठाणे, मीरा भाईंदर वसई विरार, पालघर आणि नवी मुंबई युनिटसाठी भरती होणार आहे.

Maharashtra Recruitment: महाराष्ट्रामध्ये एक हजारांहून अधिक कांस्टेबल पदांसाठी भरती मोहिम लवकरच सुरू होणार आहे. ही भरती ठाणे, पालघर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि नवी मुंबई पोलीस युनिटसाठी केली जाणार आहे. एका एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १९ जून २०२४ या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, ज्यात एकूण १ हजार १३६ पदे भरली जाणार आहेत.

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव आणि पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी भरती मोहिमेबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. कुठे किती पदे आणि किती जणांनी अर्ज केले? ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कुठे किती पदे आणि किती जणांनी अर्ज केले?

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस युनिटमध्ये २३१ कॉन्स्टेबल पदे रिक्त आहेत, ज्यासाठी ८ हजार ४२३ अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये ६ हजार ९०० पुरुष आणि १ हजार ५२३ महिलांचा समावेश आहे.

ठाण्यात ६६१ पदांसाठी एकूण ३९ हजार ०७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३० हजार १५५ अर्जदार पुरुष आणि ७ हजार ९२३ महिला आहेत. याव्यतिरिक्त, २० ड्रायव्हर पदांसाठी एकूण १ हजार ५२७ जणांनी अर्ज केला आहे, ज्यात एकूण १ हजार ४०८ पुरुष आणि ११९ महिलांचा समावेश आहे.

पालघरमध्ये ५९ जागांसाठी ३ हजार ५७७ उमेदवारांनी अर्ज केला आहे. नवी मुंबई पोलीस युनिटमध्ये १८५ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती होणार आहे, जिथे एकूण ५ हजार ९८४ उमेदवारांनी अर्ज केला आहे. यात एकूण ४ हजार ६२२ पुरुष आणि १ हजार ३६२ महिलांचा समावेश आहे.

निवड प्रक्रिया

कॉन्स्टेबल भरतीसाठी उमेदवाराला अनेक प्रक्रियेतून जावे लागेल. या प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा आणि मुलाखती यांचा समावेश होतो. तिन्ही स्तरांवर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शेवटी निवड केली जाईल आणि नंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केले जाईल.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर