Sambhaji Nagar news : राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. संभाजी नगर येथील तब्बल ५० तरुण आयसीसच्या संपर्कात असल्याची माहिती एनआयएच्या तपासात पुढे आली आहे. एनआयएनं १२ फेब्रुवारीला हसूल येथील बेरीबागेतून मोहमद जोएब खान नामक तरुण आयटी अभियंत्याला अटक केली होती. त्याच्या तपासातून ही माहिती पुढे आली आहे. एनआयएने मोहमद जोएब खान विरोधात मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात चार्जशिट दाखल केले असून यात त्यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रीय तपास पथकाने राज्य भरात मोठी कारवाई केली होती. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात संभाजी नगर येथून आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. जोएबची भरती ही लिबियातील मोहंमद शोएब खानने भरती केली होती. जोएब हा शोएबसाठी स्लिपर सेल म्हणून काम करत होता. तो आयसीसमध्ये संभाजी नगर येथून तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करत होता. त्याने देशातील अतिसंवेदनशील ठिकाणांवर घातपात करण्याची योजना आखली होती. यानंतर हे सर्व अफगाणिस्तान तसेच तुर्कियेत पळून जाणार होते, अशी माहिती एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या चार्जशिटमध्येमध्ये म्हटले आहे.
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी संभाजी नगरात फेब्रुवारी महिन्यात मोठी कारवाई करण्यात आली होती. येथील हरसुल येथील बेरीबाग येथून मोहम्मद जोएब खान (वय ४०) याला अटक करण्यात आली होती. जोएब खान हा आयटी इंजिनियर असून तो बंगलोर येथे वेब डेव्हलपर म्हणून काम करत होता. मात्र, लिबियातील शोएब खानने त्याचे मन वळवून त्याला स्लीपर सेल बनवले होते.
जोएबने आयटीची नोकरी सोडून तो दहशतवादाकडे वळला. त्याने इसिसच्या ध्येयपूर्तीसाठी शपथ देखील केली. त्याचे इतर कुटुंबीय जगातील विविध इस्लामिक देशांमध्ये स्थायीक झाले आहेत. तो भारतातून पळून जाण्याच्या तयारीत होता. या साठि पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी देखील तो प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा अर्ज प्रलंबित ठेवल्याने त्याला देशाबाहेर पळून जाता आले नाही.
शोएब आणि जोएब हे आयसीससाठी काम करत असून भारतविरोधी घातपाताच्या कारवाया करण्यासाठी त्यांनी योजना आखली होती. मात्र, त्याआधीच त्याला अटक करण्यात आली.