Monsoon Update: जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, हवामान विभागाचा दुसरा अंदाज
Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने मॉन्सूनचा दूसरा अंदाज जाहीर केला आहे. जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने आज मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर केला आहे. देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याच बरोबर देशात अनेक राज्यात तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर देशात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९६ टक्के पाऊस संपूर्ण भारतात कोसळण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
new parliament building : असल्या याचिका तुम्ही का करता आम्हाला माहीत आहे; सुप्रीम कोर्टानं याचिकादारास सुनावले खडे बोल
मॉन्सून संदर्भात माहिती देण्यासाठी हवामान विभागाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात मॉन्सूनसंदर्भात दूसरा अंदाज जाहीर करण्यात आला. राज्यात मराठवाडा, विदर्भात जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सध्या अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून याचा प्रभाव मान्सूनवर होणार असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून तिसरा अंदाज हा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असते. या अंदाजावरून पिकांचे नियोजन दरवर्षी शेतकरी करत असतात.