Monsoon 2024 Prediction: भारतात गेल्यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी, देशातील अनेक भागात दुष्काळ निर्माण झाला. शेतकऱ्यांनाही प्रचंड नुकसानीला सामोरे जावा लागले. मात्र, यावर्षी मान्सूनमध्ये संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, "भारतात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरीच्या १०६ टक्के असण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असेही ते म्हणाले. यंदाच्या वर्षी मान्सून बहुधा सामान्य आणि सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. भारताने मान्सूनच्या हंगामात नऊ प्रसंगी सामान्यपेक्षा जास्त पाऊस अनुभवला जेव्हा ला निना नंतर एल निनो आले."
हिंदी महासागरात तटस्थ हिंदी महासागर द्विध्रुवीय (आयओडी) परिस्थिती आहे आणि ताज्या हवामान मॉडेल अंदाजानुसार नैऋत्य मॉन्सून हंगामाच्या उत्तरार्धात सकारात्मक आयओडी परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. एका बाजूला पावसाळ्याच्या दिवसांची संख्या कमी होत आहे. तर, मुसळधार पावसाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी उन्हाळ्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृत्युंजय महापात्रा यांनी निवडणुकीच्या काळात देशाला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला होता. जाहीर सभा आणि मतदानाच्या वेळेत कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव विभागाने दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आयएमडीने म्हटले आहे की, विश्लेषणातून असे दिसून आले आहे की २२ ला नीना वर्षांमध्ये १९७४ आणि २००० वगळता बहुतेक वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या