Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

May 19, 2024 04:33 PM IST

Monsoon Update : उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना हवामान विभागाने मोठी खुशखबर दिली आहे. नैऋत्य मान्सून वारे अंदमानात दाखल झाले असून ३१ मे पर्यंत मान्सून भारतात दाखल होणार आहे.

मान्सून अंदमानात दाखल
मान्सून अंदमानात दाखल

India Mansoon Update : उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैरान नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या मान्सूनचं आज अंदमानात आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Weather Department) ही माहिती दिली आहे. अंदमान-निकोबार, मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सूनचं आगमन झालं आहे. ३१ मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर आणि ११ जूनला महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. (Weather Update)

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. तर महाराष्ट्रात ११ जूनला पोहोचेल. तसंच यावर्षी पाऊस जवळपास  १०६ टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

मान्सून साधारणपणे १ जूनला केरळ किनारपट्टीवर दाखल होत असतो, मात्र यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनचे आमगन तीन-चार दिवस पुढे मागे होऊ शकते, त्यामुळे ३० मे ते ४ जून दरम्यान मान्सून भारतात येण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाल्यानंतर एका आठवड्यात मान्सून केरळमध्ये येतो. दरवर्षी अंदमान बेटावर २१ मे ला दाखल होणारा मान्सून यंदा दोन दिवस आधीच म्हणजे १९ मे रोजीच दाखल झाली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी -

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भात आजपासून पुढील ५ दिवस म्हणजेच २४ मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला,  यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तर १९ मे ते २२ मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई व उपनगरात हल्का ते मध्यम पाऊस -

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. यादरम्यान, ३० ते ४० किमी ताशी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर