Assembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढचं अधिवेशन नागपुरात, तारीखही ठरली
Maharashtra Assembly Winter Session 2023: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार आहे.
मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधासनभेत केली. यापुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबर २०२३ पासून हे अधिवेशन सुरु होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात दिली.
ट्रेंडिंग न्यूज
अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या अधिवेशनात जेवढी बिले सत्ताधारी पक्षाने आणली त्यातली जवळपास सर्व बिले आम्ही मंजूर केली.
मान्सून अधिवेशनाचे एकूण कामकाज –
विधानसभेत, १८९० लक्षवेधी, १६ विधेयके संमत -
विधानसभेत प्रत्यक्षात १०९ तास २१मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ८ तास २४ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची सरासरी उपस्थिती ही ८२.९० टक्के इतकी होती.
विधानसभेत अधिवेशन काळात ४७ तारांकित प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. एकूण प्राप्त १८९० लक्षवेधी सूचनांपैकी ५१५ स्वीकृत करण्यात आल्या, तर ९८ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. विधानसभेत २४ शासकीय विधेयके मांडण्यात आली.त्यातील १६ संमत झाली.
विधानपरिषदेचे ८८ तास ३३ मिनिटे कामकाज -
विधानपरिषदेत प्रत्यक्षात ८८ तास ३३मिनिटे कामकाज झाले. याप्रमाणे दररोज सरासरी ६ तास ५३ मिनिटे सभागृह चालले. सभागृहात सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती ही ८६.९९ टक्के इतकी होती.
मंत्र्यांनी ६४ तारांकित प्रश्नांना उत्तरे दिली. एकूण प्राप्त ६७७ लक्षवेधी सूचनांपैकी १४७स्वीकृत करण्यात आल्या तर ५८लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. विधानपरिषदेत १३ विधेयके संमत करण्यात आली. तर २ विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली.