Monsoon Update : राज्यातील नागरिक उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. या पावसामुळे सोमवारी मुंबईत ८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर हवमान विभागाने राज्यात आणखी काही दिवस हे अवकाळी पावसाचे राहणार असल्याचे म्हटले आहे. या पावसामुळे आता अनेकांना मॉन्सूनचे वेध लागले आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी बळीराजासाठी गुडन्यूज दिली आहे. देशात मॉन्सूनचे आगमन कधी होणार या बाबत हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे.
देशात मान्सूनचे १९ मे च्या जवळपास आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात या दिवशी मॉन्सून दाखल होणार आहे. त्यानंतर मान्सूनचे केरळमध्ये प्रवेश करणार आहे. या बाबत हवामान विभागाने तारीख तारीख केलेली नाही. सध्या वातावरणातील मोठे बदल पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात व राज्यात लवकर मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
नागरिक गेले दोन महिने उकाड्याने आणि वादळी पावसामुळे हैराण झाल्यानंतर आता मॉन्सूनकधी येणार अशी उत्सुकता निर्माण झाली असतांना दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर १९ मे मॉन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण हिंद महासागरात वाऱ्याची प्रती चक्रीय स्थिती निर्माण होऊन वारे उत्तरेला वाटचाल करतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे विषुववृत्त पार केल्यानंतर त्यांची वाटचाल मॉन्सूनच्या दिशेने सुरू होते. अंदमानमध्ये हे मॉन्सून वारे दाखल झाल्यावर या वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होते अनाई पाऊस पडतो. अंदमानमध्ये सुमारे २४ तास पाऊस झालीवर मॉन्सून झाल्याचे जाहीर केले जाते.
एरवी मान्सूनचा हा २१ मे च्या जवळपास अंदमानमध्ये दाखल होट असतो, यावर्षी मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून बंगालच्या उपसागरातील तयार होणाऱ्या वातावरणाच्या स्थितीवर कसा पुढे जाईल हे अवलंबून असते. मान्सूनच्या मार्गक्रमणात कोणतेही अडथळे न आल्यास साधारण १ जूनच्या जवळपास मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून ८ जूनच्या आसपास सक्रिय होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी राज्यात मान्सून १६ जूनला दाखल होता. यावर्षी तो लवकर येण्याची शक्यता आहे.
देशातील खरीप हंगाम हा मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असतो. जून, जुलै महिन्यात शेतकरी खरीपाच्या पेरण्या करत अस्तानात. त्यामुळे मॉन्सूनबाबत त्यांना उत्सुकता असते. सध्या मॉन्सूनपूर्व शेतीमशागितीची कामे सुरू आहेत. ही कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. त्यात मान्सून बाबत महत्वाची अपडेट आल्याने बळीराजा खुश झाला आहे.
संबंधित बातम्या