Mumbai murder news : नशेच्या आहारी गेलेल्या तरुणासोबत मुलीनं केलं डेटिंग; आईनं केला मुलीचा गळा आवळून खून
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai murder news : नशेच्या आहारी गेलेल्या तरुणासोबत मुलीनं केलं डेटिंग; आईनं केला मुलीचा गळा आवळून खून

Mumbai murder news : नशेच्या आहारी गेलेल्या तरुणासोबत मुलीनं केलं डेटिंग; आईनं केला मुलीचा गळा आवळून खून

Mar 13, 2024 10:34 AM IST

Mumbai murder news : मुंबईत (mumbai crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्याच मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघकडीस आली आहे.

नशेच्या आहारी गेलेल्या तरुणासोबत मुलीनं केलं डेटिंग; आईनं केला मुलीचा गळा आवळून खून
नशेच्या आहारी गेलेल्या तरुणासोबत मुलीनं केलं डेटिंग; आईनं केला मुलीचा गळा आवळून खून

Mumbai murder news : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने एका नशेच्या आहारी गेलेल्या एका मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याने आईने आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर मुलीच्या आकस्मिक मृत्यूचा बनाव तिने रचला. ही घटना मुलीच्या दोन्ही भावांनी पाहिली. मात्र, त्यांनी तिने त्यांना विश्वासात घेतले. दरम्यान, मुलीच्या शवविच्छेदन अहवालावरून खुनाची बाब उघड झाली. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे.

टीना बगाडे असे (वय ४०) असे आरोपी आईचे नाव आहे. ती घरात मदतनीस म्हणून काम करते. तर भूमिका बगाडे असे खून केलेल्या मुलीचे नाव असून ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिका हिचे एका कथित अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीशी डेटिंग केले. याला टिना बगाडे यांचा विरोध होता. यावरून सोमवारी पहाटे वांद्रे चाळीतील त्यांच्या घरी दोघांमध्ये मोठा वाद झाला. भांडण वाढत गेल्याने टीनाने रागाच्या भरात भूमिकाची गळा आवळून हत्या केली.

दरम्यान, खुनाची घटना लपवण्यासाठी टीनाने शेजाऱ्यांशी संपर्क साधला, भूमिकाचा अचानक दम्याचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे तिने खोटे सांगितले. दरम्यान, निर्मल नगर पोलिसांनी तिच्या माहितीच्या आधारे अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, शवविच्छेदन अहवालात टिनाचे बिंग फुटले.

भांडण सुरू असतांना भूमिकाला दम्याचा झटका आला. दरम्यान, मदत मागण्यासाठी शेजाऱ्यांकडे गेली असता भूमीकाचा मृत्यू झाल्याचे तिने सांगितले.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “पोस्टमॉर्टम तपासणी अहवालामुळे आम्हाला सत्य उघडकीस येण्यास मदत झाली. अहवालात भूमिकाच्या मानेवर स्पष्टपणे गळा दाबल्याच्या खुणा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, चौकशीदरम्यान, टीना म्हणाली की, भूमिकाचे एका ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणा सोबत प्रेमसंबंध होते. यावर टिनाला आक्षेप होता. यामुळे त्यांच्यात वाद झाले. या वादात भूमिकाने आई टिनाच्या हाताला चावा घेतला. यावेळी चिडलेल्या टिनाने रागाच्या भरात भूमिकाचा गळा आवळून खून केला. भूमिकाच्या धाकट्या भाऊ आणि बहिणीने ही घटना डोळ्याने पहिली. मात्र, टिनाने त्यांना विश्वासात घेऊन भूमिकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा बनाव रचला. या खटल्यातील दोघे साक्षीदार आहेत. जेव्हा भूमिकाने तिच्या आईच्या बोटाला चावा घेतला तेव्हा परिस्थिती आणखीनच वाढली. टीनाने स्वसंरक्षणार्थ तिचा गळा दाबून खून केला आणि तो दम्याचा अटॅक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला,” असे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

टीनावर आयपीसी कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीनाला कोर्टाने १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर